मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /पिंपल्स फोडण्याची चूक केलीत? 'हे' उपाय केल्यास मिळेल आराम

पिंपल्स फोडण्याची चूक केलीत? 'हे' उपाय केल्यास मिळेल आराम

पिंपल्स फोडण्याची चूक केलीत? 'हे' उपाय केल्यास मिळेल आराम

पिंपल्स फोडण्याची चूक केलीत? 'हे' उपाय केल्यास मिळेल आराम

अनेक जणी पिंपल्स फोडण्याचा प्रयत्न करतात आणि मग चेहऱ्याचं सौंदर्य गमावून बसतात. अशा परिस्थितीत काय करता येईल जाणून घ्या.

  मुंबई, 07 जून:  सौंदर्य (Beauty) ही प्रत्येकासाठीच आणि विशेषतः स्त्रियांसाठी तर अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणूनच सौंदर्याला बाधा ठरणाऱ्या समस्यांवर लगेचच उपाय शोधण्याची त्यांची तयारी असते. पिंपल्स (Pimples) म्हणजेच मुरमं चेहऱ्याच्या सौंदर्यात अशाच प्रकारे बाधा आणतात. त्यामुळे अनेक जणी पिंपल्स फोडण्याचा प्रयत्न करतात आणि मग चेहऱ्याचं सौंदर्य गमावून बसतात. अशा परिस्थितीत काय करता येईल, असा प्रश्न अनेकींना पडलेला असतो. त्याविषयी आपण जाणून घेऊ या. याबाबत माहिती देणारं वृत्त 'टीव्ही 9 हिंदी'नं प्रसिद्ध केलं आहे.

  चेहऱ्यावर पिंपल्स येण्यासाठी बऱ्याचदा धूळ आणि त्वचेवर तेल (Oily Skin Problem) निर्माण होणं कारणीभूत ठरतं. अशा वेळी पिम्पल्स फोडणं तर दूरच, पण त्यांना सारखं हात लावणंही चुकीचं असतं, असा सल्ला त्वचाविकार तज्ज्ञ देतात. त्यामुळे त्वचेवर पिंपल्सचे डाग तसेच राहू शकतात. कधीकधी पिंपल्स फोडल्यानं त्यातून रक्त येतं. अशा वेळी वाइप्सच्या साह्यानं ते स्वच्छ करणं किंवा चेहरा धुणं अशा गोष्टी केल्या जातात. त्यामुळे पिंपल्स चुकून जरी फोडले गेले, तरी काय करावं याबाबत जाणून घेऊ या.

  हेही वाचा - केरळमध्ये पसरलेला नोरोव्हायरस किती जीवघेणा? ही लक्षणे आढळल्यास लगेच डॉक्टरांकडे जा

  • पिंपल्स फोडल्यामुळे आपल्या बोटांवरच्या किंवा नखांमधल्या बॅक्टेरियाजमुळे त्वचेचं इन्फेक्शन होण्याची भीती असते. त्यामुळे चुकून जरी पिंपल्स फोडले गेले असतील, तर पहिल्यांदा हात साबणाने स्वच्छ करा.
  •  पिंपल्स फोडल्यानंतर तो भाग स्वच्छ केला पाहिजे. त्यासाठी सॅलिसिलिक अ‍ॅसिडचा (Salicilic Acid) वापर करता येतो. ते लावल्यावर चेहरा चोळून स्वच्छ न करता हलक्या हातानं कापसानं स्वच्छ करावा. टॉवेलचा वापरही करू नये.
  • पिंपल्स फोडल्यावर त्या ठिकाणी काही वेळ सूज राहते. कधी कधी सुजेमुळे तिथे दुखायला लागतं. अशा वेळी बर्फानं मसाज (Ice Massage) करावा. एका सुती कापडात बर्फाचा तुकडा गुंडाळून त्यानं त्या भागावर मसाज केल्यास आराम मिळतो.
  • दिवसातून दोन-तीन वेळा पिंपल्स फोडलेला भाग धुवा. तसंच सुती कापडानंच तो पुसा. अशानं त्या भागाची स्वच्छता राखली जाईल.

  चेहऱ्यावर किंवा इतर ठिकाणी पिंपल्स आले असतील, तर ते फोडूच नयेत. कधीकधी चुकूनही पिंपल्स फुटतात. अशा वेळी ती जागा स्वच्छ करून इन्फेक्शन होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. अन्यथा चेहऱ्यावर काळे डाग तसेच राहतात. पिंपल्स येऊ नयेत, यासाठी काळजी घेता येते; पण ते टाळता येत नाही. त्यामुळे पिंपल्स आलेच, तरी ते न फोडणं योग्य ठरतं.

  First published:

  Tags: Lifestyle, Skin care