कोबीवर सर्वात जास्त वेळ राहतो कोरोना; WHO च्या नावाने मेसेज व्हायरल, काय आहे सत्य?

कोबीवर सर्वात जास्त वेळ राहतो कोरोना; WHO च्या नावाने मेसेज व्हायरल, काय आहे सत्य?

WHO च्या रिपोर्टनुसार, कोरोनाव्हायरस (Coronavirus) कोबीवर (cabbage) सर्वात जास्त तग धरतो, अशा आशयाचे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • Share this:

मुंबई, 04 एप्रिल : कोरोनाग्रस्त व्यक्ती शिंकल्यानंतर किंवा खोकल्यानंतर शिंतोडे जर एखाद्या ठिकाणी उडाले असतील तर कोरोनाव्हायरस (Coronavirus) तिथे असू शकतो. अगदी फळे आणि भाज्यांवर हा व्हायरस असू शकतो. मात्र कोबीवर (cabbage) तो सर्वात जास्त तग धरतो, असं जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटलं आहे. त्यामुळे कोबी खाऊ नका, अशा आशयाचे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये नमूद केलं आहे की, 'WHO च्या अहवालानुसार कोबीवर कोरोनाव्हायरस सर्वात जास्त वेळ राहतो. इतर ठिकाणी हा व्हायरस 9-12 तास राहतो तर कोबीवर 30 तासांपेक्षा जास्त वेळ राहतो. त्यामुळे कोबी खाऊ नका'

न्यूज 18 लोकमतने याबाबत fact check केलं. PIB ने या दाव्यात काहीही तथ्य नसल्याचं सांगितलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने असा कोणताही रिपोर्ट जारी केलेला नाही. त्यामुळे अशा पोस्टवर विश्वास ठेऊ नका. खरंतर WHO च्या काही अहवालानुसार, कोबीमध्ये टेपवॉर्म किंवा त्यांच्या अळ्या असल्याचं सांगितलं आहे. जर कोबी नीट शिजवून खाल्ला नाही. तर आपण आजारी पडू शकतो.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर कोबीवर कोरोनाव्हायरस असेल तर व्हायरस पसरू शकतो. त्यामुळे खबरदारी म्हणून कोबी गरम पाण्यात धुवून घ्यावा आणि पण हात नीट स्वच्छ करावेत. कच्ची किंवा अर्धवट शिजलेली कोबी खाऊ नये.

First published: April 7, 2020, 11:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading