जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / सकाळी उठल्यानंतर अनेकांच्याकडून होतात या चुका; वेळीच ओळखा आरोग्याला होणारे अपाय

सकाळी उठल्यानंतर अनेकांच्याकडून होतात या चुका; वेळीच ओळखा आरोग्याला होणारे अपाय

सकाळी उठल्यानंतर अनेकांच्याकडून होतात या चुका; वेळीच ओळखा आरोग्याला होणारे अपाय

आज फिट राहणं ही सर्वांचीच गरज बनली आहे. पण तरीही आपल्या सर्वांनाच अनेक वर्षांपासून अशा काही सवयी (Habits) पडलेल्या असतात, ज्या चूक आहेत की बरोबर हे आपल्याला माहितीही नसतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : आज लोक आरोग्याबद्दल खूप जागरूक (Very health conscious) झाले आहेत आणि आरोग्याची विशेष काळजी घेत आहेत. आज फिट राहणं ही सर्वांचीच गरज बनली आहे. पण तरीही आपल्या सर्वांनाच अनेक वर्षांपासून अशा काही सवयी (Habits) पडलेल्या असतात, ज्या चूक आहेत की बरोबर हे आपल्याला माहितीही नसतं. जाणून घेऊ अशा तीन सवयींबद्दल. 1. सकाळी उठल्यावर पलंगावर योगासनं करणं काही लोक सकाळी उठल्याबरोबर पलंगावरच योगासनं करण्यास सुरुवात करतात. ही सवय आरोग्यासाठी फारशी फायदेशीर नाही. सकाळी उठून शौचमुखमार्जन (शौचविधी आणि दात घासणं, तोंड धुणं) करावं. त्यानंतर उकीडव्या अवस्थेत बसून साधारणपणे एक लिटर गरम पाणी प्यावं. यानंतर काही वेळानं (साधारण 10 ते 15 मिनिटांनी) आपण योगासनं करू शकतो. 2. मोबाईल चेक करणं सकाळी उठल्याबरोबर मोबाईल शोधणं आणि सगळ्यात आधी फोन चेक करणं ही अनेकांची सवय असते. जर तुम्ही असं करत असाल तर, ते सोडून द्या किंवा ते शक्य नसेल तर, फार वेळ मोबाईलमध्ये घालवू नका. कारण, जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपले डोळे खूप संवेदनशील झालेले असतात. या वेळी मोबाईलचा प्रकाश डोळ्यांना खराब करू शकतो. हे वाचा -  मास्क घालायलाच नको; सरळ नाकात लावता येईल हा एअर प्युरिफायर, N-95 इतकाच सुरक्षित 3. न्याहारी नीट न करणं सकाळी उठल्यानंतर साधारण एका तासानं न्याहारी करावी. नाश्ता हा संपूर्ण आहार असावा, ज्यामुळं आपल्याला दिवसभर सक्रिय राहण्यासाठी ऊर्जा मिळेल. न्याहारी केल्यानं केवळ शारीरिकट नाही तर, मानसिक ऊर्जा मिळते; जी तुमच्या शरीरासाठी आणि दिनचर्येसाठी आवश्यक असते. त्यामुळं दररोज पुरेशा प्रमाणात नाश्ता करा आणि यामध्ये पोषक पदार्थांचा समावेश करा. हे वाचा -  रात्र-रात्रभर झोप येत नाही? ही ट्रिक वापरून 60 सेंकदात व्हाल गुडूप,एकदा करून बघा (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात