नुपूर पाटील, प्रतिनिधी
मुंबई, 1 एप्रिल : ज्वेलरी हा महिलांच्या मोठ्या जिव्हाळ्याचा विषय असतो. मुंबईत अनेक ठिकाणी ज्वेलरी शॉप आहेत. मालाड, भुलेश्वर, क्रॉफर्ड मार्केट हे भाग ज्वेलरीसाठी प्रसिद्ध आहेत. या मार्केटमध्ये तुम्ही गेलात आणि काही खरेदी केलं नाही, असं कधी होतच नाही. नवीन ट्रेंडी दागिन्यांचा खजाना तुम्हाला या मार्केटमध्ये पाहायला मिळतात. हे दागिने खरेदी करताना अनेकदा बजेटचाही विचार करावा लागतो. त्यामुळे क्रॉफर्ड मार्केटमध्ये सर्वात स्वस्त ज्वेलरीचं शॉप कोणतं आहे, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कोणती ज्वेलरी मिळते?
क्रॉफर्ड मेार्केटमधील ओरिएन फॅशन ज्वेलरी हे स्वस्त दागिन्यांचं शॉप आहे. या ठिकाणी तुम्हाला अमेरिकन डायमंड नेकलेस, बेन्टेक्स नेकलेस, मेटल क्लिप्स, प्लास्टिक क्लिप्स, अंगठ्या, झूमका, टॉप्स अश्या प्रकारची विविध ज्वेलरी येथे मिळते. मोती, डायमंड क्लचर, ब्रेसलेट्ससुद्धा इथं मिळतात. हे रिझनेबल आणि होलसेल दरातील शॉप असून अनेक वस्तू बाहेरच्या वस्तूंपेक्षा निम्म्या दरात तुम्हाला खरेदी करता येतात.
Mumbai Wholesale Market : 150 पेक्षा जास्त ब्लाऊजचे पॅटर्न मिळतील स्वस्त दरात! पाहा Video
रिसेलिंगचाही पर्याय
लॉकडाऊननंतर अनेकजण दागिन्यांची रिसेलिंग करत आहेत. .ज्वेलरी रिसेलिंग करणाऱ्या विक्रेत्यांसाठी क्रॉफोर्ड मार्केटमधलं हे दुकान उत्तम ऑप्शन आहे.सगळ्या प्रकारचे ट्रेंडी दागिने या दुकानातून तुम्ही सोशियल मीडियाच्या माध्यमातून रिसेल करू शकता.
ओरिअन फॅशन ज्वेलरी हे टेलिग्राम, व्हाट्स ऍपवर बिजनेस ग्रुप आहे. याच्या माध्यमातून ज्वेलरी रिसेलिंग उपलब्ध आहे. अगदी 50 रुपये ते 2000 रुपयांपर्यंत सगळ्या प्रकारची ज्वेलरी तुम्हाला इथं खरेदी करता येईल.
गूगल मॅपवरून साभार
कुठे आहे दुकान?
ओरिओन फॅशन ज्वेलरी 506/510 5th फ्लोअर सफा सेन्टर शेख मेमन स्ट्रीट
निअर ब्युटी सेन्टर, क्रोफर्ड मार्केट,मुंबई - 400002
+919029290129
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.