नुपूर पाटील, प्रतिनिधी
मुंबई , 29 मार्च : साडी, लेहेंगा, स्कर्ट हे सर्व प्रकार महिलांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. या कपड्यांवर परिधान करण्यासाठी मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज लागतात. मुंबईमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक पण होलसेल दरामध्ये ब्लाऊजच कुठे खरेदी करता येतील याची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
काय आहे खास?
श्वेता इनामदार या मुंबईतर महिलेच्या शॉपमध्ये 150 पेक्षा जास्त ब्लाऊज मिळतात. त्यांच्या वडिलांचा पुण्यात ब्लाऊजचा लहान व्यवसाय होता. त्यानंतर श्वेता यांनी ही जबाबदारी स्विकारलाी. ए.एस. इनामदार ब्लाऊज म्हणून त्यांनी हा व्यवसाय मोठा केला आहे. त्यांच्या पुणे, दादर (मुंबई), ठाण्यात ब्रँच आहेत. एका महाराष्ट्रीय महिलेनं सुरू केलेला हा व्यवसाय आता सातासमुद्रापार अमेरिकेतही पोहचला आहे.
जालन्यातील तरुणी बनली फॅशन विश्वात ब्रँड, जगभरात होतीय कपड्यांची निर्यात, Video
कोणते प्रकार उपलब्ध?
दादरमधील रानडे रोड जवळ असलेल्या या दुकानात ब्लाऊजच्या अनेक व्हरायटी मिळतात. प्लेन कटोरी कट,खादी सिल्क,ओरिसा कॉटन,जॅकेट ब्लाउज,कटवर्क बोटनेक,बोटनेक मोटिफ,दिया सिल्क,कॅलीग्राफी हॅन्ड पेंटिंग,कलमकरी,पटोला सिल्क,कॉटन पटोला,केडिया,गझी सिल्क,बनारस सिल्क,2 डी पॅटर्न,इंडो वेस्टर्ण,सिंगलेट असे 150 पेक्षा जास्त प्रकार या दुकानात उपलब्ध आहेत.
प्लेन कटोरी कट या ब्लाऊज प्रकारात 3000 पेक्षा जास्त रंग येथे मिळतात. प्रत्येक रंगाचा प्रत्येक शेड मिळतो. तसेच इतर कपडातले सुद्धा भरपूर रंग इथं खरेदी करता येतील. प्रत्येक साडीवर मॅचिंग रंग येथे तुम्हाला मिळेल. चित्रपट सृष्टीतील अनेक महिला कलाकार, गायिका येथूनच ब्लाऊज खरेदी करणं पसंत करतात. कॉटन, सिल्क, खादी कॉटन, कांजीवरम अश्या अनेक प्रकारच्या कापडा पासून हे ब्लाऊज तयार केले जातात. परफेक्ट फिटिंग आणि साईझचे ब्लाऊज येथे तयार होतात. त्याचबरोबर याची होलसेलमध्ये विक्री केली जाते.
काय आहे किंमत?
येथे 350 रुपयांपासून ते 4 हजार रुपये तसेच हेवी लेहेंग्यावरचे ब्लाऊज डिझाईन करून मिळतात. कापडाप्रमाणे त्याचे रेट्स आहेत. उत्तम फिटिंग आणि क्वालिटी इथं मिळते, अशी माहिती एएस इनामदारच्या संचालिका श्वेता इनामदार यांनी दिली.
गूगल मॅपवरून साभार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.