जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Mumbai Wholesale Market : मुंबईतील 'या' मार्केटमध्ये लेडीज चप्पल मिळतात सर्वात स्वस्त, पाहा Video

Mumbai Wholesale Market : मुंबईतील 'या' मार्केटमध्ये लेडीज चप्पल मिळतात सर्वात स्वस्त, पाहा Video

Mumbai Wholesale Market : मुंबईतील 'या' मार्केटमध्ये लेडीज चप्पल मिळतात सर्वात स्वस्त, पाहा Video

Mumbai Wholesale Market : मुंबईकर महिला स्वस्त चप्पल आणि शूजच्या खरेदीसाठी या मार्केटला पहिली पसंती देतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नुपूर पाटील, प्रतिनिधी मुंबई, 1 मार्च : मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागातील दादरची बाजारपेठ संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातील नागरिक इथं खरेदीसाठी येतात. त्याचबरोबर अनेक मुंबईकरही आपली नेहमीची खरेदी करण्यासाठी दादरलाच पहिली पसंती देतात. स्वस्त दरामध्ये मिळणाऱ्या वस्तू आणि भरपूर व्हायरटी हे दादरमधील मार्केटचं खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच हे विशेष लोकप्रिय आहे. दादरच्या मुख्य बाजाराच्या बाहेर एक चप्पलचा छोटासा बाजार आहे. त्या बाजाराबद्दल अनेकांना फारशी माहिती नाही. या लहानशा बाजारात इतक मार्केटपेक्षा कमी किंमतीमध्ये उपलब्ध आहेत. दादर टीटीच्या भागात हे चप्पल मार्केट आहे.  या मार्केटमध्ये मोठ्या ब्रँडच्या दुकानांसह फूटपाथवरही चप्पलची दुकानं आहेत. या मार्केटमध्ये कमी दुकानं असली तरी चप्पलची व्हरायटी मात्र भरपूर बघायला मिळते. जगभरातील सर्व शूज स्वस्तात मिळणारे मुंबईचे मार्केट, पाहा Video कोणत्या प्रकारच्या चप्पल मिळतात? दादर टी टी येथे असलेल्या चप्पल मार्केटमध्ये फॉर्मल, ट्रेडीशनल, कॅज्युअल चप्पल महिला वर्गासाठी खास मिळतात. विविधरंगी ऑफिसमध्ये वापरता येतील असे शूज, लोफर, नॉड चप्पल, नॉड शूज, अँकल शूज येथे उपलब्ध आहेत. अशी माहिती चप्पल विक्रेता संतोष यांनी दिली. काय आहे किंमत? दादरमधील या मार्केटमध्ये  200 रुपये ते 550 रुपयांपर्यंत चप्पल उपलब्ध आहेत. मुंबईच्या विविध भागातून महिला चप्पल खरेदीसाठी इथं येतात.  प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग चप्पल इथं मिळतात.मुख्य बाजारपेठेपेक्षा 50 रुपयांनी कमी किंमतीमध्ये इथं खरेदी करता येते.

    News18लोकमत
    News18लोकमत

    नेमकं कुठे आहे मार्केट? दादर इस्टला स्टेशनपासून 5 मिनिटांच्या अंतरावर हे मार्केट आहे. दादर टर्मीनल्सच्या ब्रिजवरून खाली उतरल्यावर समोरच पायऱ्या दिसतात पायऱ्याचढून वरच्या वाहन ब्रिजवर गेल्यावर उजव्या बाजूला सरळ चालत गेल्यावर दादर टी टी सर्कलचा सिग्नल आहे. तेथेच कोपऱ्यावर हे मार्केट आहे. मार्केटचा पत्ता दादर टीटी सर्कल, दादर पूर्व, मुंबई - 400014

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात