नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : जगभरात दिवसेंदिवस कोरोनाचा (coronvirus) विळखा अधिक घट्ट होत आहे. याच दरम्यान कोरोनाची लस (coron vaccine) कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अखेर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन (Health Minister Dr Harsh Vardhan) यांनी आपल्या सर्वांना पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर दिलं. आहे. पुढच्या वर्षीच भारतात कोरोनाची लस मिळेल, अशी आशा आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले, "पुढच्या वर्षी सुरुवातीलाच भारतात कोरोनाची लस उपलब्ध येईल. एकापेक्षा अधिक कंपनीच्या कोरोना लशी उपलब्ध होतील. ही लस देशभरात कशी वितरित करायची याबाबत तज्ज्ञांची समिती योजना तयार करत आहे"
We're expecting that early next year we should have vaccine in the country from maybe more than one source. Our expert groups are formulating strategies to plan on how to roll out the distribution of the vaccine in the country: Union Health Min during Group of Ministers meeting pic.twitter.com/M2G0QzNFxG
— ANI (@ANI) October 13, 2020
सध्या कोव्हिड-19 लशी क्लिनिकल ट्रायलच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आहेत. याच्या परिणामाची प्रतीक्षा आहे. कोरोना रुग्णांवर या लशींच्या आपात्कालीन वापरासाठी परवानगी देण्यासाठी पुरेशी सुरक्षा आणि आकडेवारीची गरज आहे. त्यावरच परवानगी दिली जाईल, असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.
हे वाचा - Vaccine दिलेल्या रुग्णाला झाला विचित्र आजार, जॉन्सन अँड जॉन्सनची ट्रायल थांबवली
दरम्यान याआधी बोलताना संडे संवाद कार्यक्रमात बोलताना डॉ. हर्ष वर्धन यांनी भारतात 400-500 दशलक्ष डोस देण्याची सरकारची योजना असल्याचं सांगितलं होतं. जवळपास 20-25 कोटी लोकांपर्यंत जुलै 2021 पर्यंत ही लस देण्याचं लक्ष्य आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी लस दिली जाणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगतिलं. तसंच कोणत्या लोकांना सर्वात आधी लस दिली जावी, याबाबत राज्यांकडूनही ऑक्टोबरअखेरपर्यंत सूचना मागवल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Coronavirus