जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असतील तर काय कराल? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असतील तर काय कराल? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

रिलेशनशिप टिप्स

रिलेशनशिप टिप्स

ही परिस्थिती जितकी कठीण आहे तितकीच ती हुशारीनं हाताळणं गरजेचं आहे. त्यासाठी काही टिप्स या ठिकाणी दिल्या आहेत.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 12 जून : सध्याच्या काळात विवाहबाह्य संबंधांची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. आपला नवरा दुसऱ्या स्त्रीवर प्रेम करतो ही गोष्ट मान्य करणं कोणत्याही विवाहित स्त्रीसाठी फार कठीण ठरते. यामुळे तिचा स्वाभिमान तर दुखावला जातोच शिवाय मानसिक त्रासही वाढतो. सगळं सोडून एखाद्या पुरुषासोबत सेटल झाल्यावर जर अशा प्रकारची फसवणूक झाली तर पुढे काय करायचं, हे समजून घेणं फार अवघड होऊन बसतं. त्यामुळे या समस्येतून स्वतःला कसं बाहेर काढायचं हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. एखाद्या स्त्रीला आपल्या नवऱ्याच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल माहिती मिळाल्यास, हे प्रकरण अधिक चांगल्या पद्धतीनं कसं हाताळायचं यासाठी काही तज्ज्ञांनी सल्ले दिले आहेत. ‘नवभारत टाइम्स’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    ‘प्रेडिक्शन्स फॉर सक्सेस’चे संस्थापक आणि रिलेशनशिप कोच विशाल भारद्वाज म्हणतात की, पती-पत्नीमधील नातं हे प्रेम आणि अद्वैत असतं. आपला नवरा दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात आहे, हे कळणं किती वेदनादायक असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. ही नक्कीच कठीण परिस्थिती आहे. पण, ही परिस्थिती जितकी कठीण आहे तितकीच ती हुशारीनं हाताळणं गरजेचं आहे. त्यासाठी काही टिप्स या ठिकाणी दिल्या आहेत.

    Throuple Relationship : दोघात तिसरा.. अनेक देशांमध्ये वाढतोय ट्रेंड, नेमकं काय आहे थ्रपल रिलेशनशिप

    1) स्वत:चा भावनिक कोंडमारा करू नका: तज्ज्ञांच्या मते, पतीच्या विवाहबाह्य संबंधांच्या समस्येचा सामना करत असलेल्या कोणत्याही स्त्रीनं सर्वांत अगोदर हे लक्षात ठेवलं पाहिजे की, तिनं तिच्या भावना दडपून ठेवू नयेत. त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्यातून होणारा मानसिक त्रास स्वीकारा. तुम्हाला होणारं दुःख, आलेला राग किंवा फसवणूक या भावनांचं समर्थन करू नका. आवश्यक असल्यास, थोडा वेळ काढून या सर्व भावनांवर प्रक्रिया करण्याची स्वत:ला संधी द्या. 2) नवऱ्याशी स्पष्टपणे चर्चा करा: जर तुम्हाला 100 टक्के खात्री असेल की, तुमचा नवरा दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करतो तर त्याच्याशी त्याबद्दल मोकळेपणानं बोला. त्याला त्याच्या भावना शांतपणे शेअर करण्याची संधी द्या आणि तुम्हीही तुमच्या भावना शेअर करा. घडलेल्या घटनेनंतर तुम्हाला तुमच्या पतीशी शांतपणे बोलण्याची इच्छा नसण्याची शक्यता जास्त आहे. पण, खोटं न बोलता समोरासमोर स्पष्टपणे चर्चा करणं हा, परिस्थिती हाताळण्याचा योग्य मार्ग आहे. चर्चेच्या माध्यमातून तुम्ही दोघंही तुमचं भविष्य सहज आणि चांगल्या पद्धतीनं ठरवू शकाल. राग आणि मनातील कटुता तुमचं कमकुवत झालेलं वैवाहिक जीवन सहज खंडित करू शकतं. त्यामुळे जोडीदाराशी स्पष्टपणे बोलायला शिका.

    नवरा-बायकोंनी भांडणानंतर अजिबात करू नका ‘या’ चुका

    3) कुटुंबाची मदत घ्या: दोन व्यक्तींच्या लग्नात त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा असतो. नात्यात येणारी प्रत्येक समस्या कुटुंबियांच्या मदतीने सहज सोडवता येते. त्यामुळे पतीचं दुसऱ्या स्त्रीवर प्रेम असल्याचं लक्षात येताच अगोदर पतीशी बोला आणि नंतर ही बाब घरच्यांसमोर मांडा. कुटुंबातील व्यक्ती तुम्हाला या परिस्थितीचा योग्य प्रकारे सामना करण्यास मदत करतील. 4) आपल्या निर्णयाचा काळजीपूर्वक विचार करा: लग्नानंतर अनेकवेळा स्त्रिया नवऱ्याच्या प्रेमसंबंधांची कल्पना असून, विविध प्रकारच्या दबावामुळे त्याचा स्वीकार करतात. काही स्त्रिया आपल्या नात्याला दुसरी संधी देतात. पण, अनेकदा ही दुसरी संधी तिसरी आणि चौथीही ठरते. असं होऊ नये यासाठी तुमच्या निर्णयाचा नेहमी नीट विचार करा. तुम्ही नवऱ्यासोबत राहण्याचा किंवा वेगळं होण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याचाही पुन्हा विचार करा. 5) प्रोफेशनल मदत घ्या: जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही स्वत: किंवा कुटुंबातील सदस्य ही परिस्थिती योग्यरित्या हाताळू शकणार नाही, तर प्रोफेशनल्सची मदत घ्या. असं अनेकदा घडतं की, दुःखी आणि रागात असताना योग्य मार्ग समजत नाही. अशा परिस्थितीत रिलेशनशीप एक्सपर्ट तुम्हाला चांगला सल्ला देऊ शकतात. तसंच या एक्सपर्टच्या रुपात, तुम्हाला मनातील भावना व्यक्त करण्यासाठी एक सुरक्षित जागादेखील मिळेल. तुम्ही शेवटी काय निर्णय घ्याल, हे तुमच्या दोघांवर अवलंबून असेल. पण, त्यात स्पष्टता असणं महत्त्वाचं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात