नातं कोणतंही असो, त्यात चढ-उतार होत असतात. नवरा-बायकोचं नातं याला अपवाद नाही. अनेक वेळा ही भांडण इतकी टोकाची होतात की, नवरा-बायको वेगळं होण्याचा निर्णय घेतात. अशावेळी नवरा-बायको काही चुका टाळून काही प्रसंग टाळू शकतात. पहिली सर्वात मोठी चूक म्हणजे भांडणानंतर ते एकमेकांशी बोलत नाही, हे अत्यंत चुकीचं आहे. भांडण झाल्यानंतर दोघांनी एकमेकांशी बोलवं, चूक कोणाचीही असो एकमेकांशी माफी मागावी. जेव्हा भांडण झालं तेव्हा त्याबाबत सोशल मीडियावर लिहिण्याची चूक करू नये. तिसरी आणि महत्त्वाची चूक म्हणजे भांडण झाल्यानंतर नवरा-बायको विषय सोडून देतात. मात्र तो सोडवण्याचा प्रयत्न करीत नाहीत. ज्या मुद्द्यावरुन भांडण झालं, ते सोडवणं अत्यंत आवश्यक आहे. समस्या सोडवल्यानंतरच नातं पुढे जाऊ शकतं.