नवी दिल्ली, 03 डिसेंबर : आजकाल बहुतेक लोकांना डायनिंग टेबलवर जेवायला आवडतं. पण जमिनीवर बसून जेवण खाण्याचे फायदे आपण जाणून घेतले पाहिजेत. जमिनीवर बसून भोजन (Sitting on the Floor while Eating) करण्याची परंपरा भारतात प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. त्याचा आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. यामुळं रक्ताभिसरण सुधारतं. हे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी देखील चांगलं आहे. झी न्यूजनं याबाबतची माहिती दिली आहे.
तणाव कमी होईल
'झी न्यूज'ने दिलेल्या बातमीनुसार आपण ज्या पद्धतीने जमिनीवर एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून मांडी घालून बसतो, ती आसनाची मुद्रा आहे. सुखासन किंवा पद्मासन अशा दोन प्रकारच्या मुद्रा असतात. या दोन्ही आसनांमुळं एकाग्रता वाढते आणि मानसिक ताण दूर होतो. अशा प्रकारे खाल्ल्यानं अन्नाचा पुरेपूर फायदा होतो आणि पचनक्रिया चांगली होते. टेबल-खुर्चीवर बसून जेवल्यानं तुम्हाला हा फायदा मिळत नाही.
पचन चांगलं होईल
जमिनीवर बसून जेवताना तुम्ही जेवायला ताटाकडे झुकता. ही एक नैसर्गिक स्थिती आहे. यात पुढे आणि नंतर मागे वाकण्याची प्रक्रिया होत असल्यानं पोटाचे स्नायू सतत काम करत राहतात. यामुळं पचनक्रिया सुधारते आणि तुम्हाला खाण्याचा पूर्ण फायदा होईल.
हे वाचा - Health Tips: तुम्हाला माहीत आहे का? या गोष्टी शिजवून खाणं आरोग्यासाठी असतं अपायकारक
शरीराची स्थिती चांगली राहील
अशा प्रकारे बसून खाण्याच्या सवयीमुळं शरीराची मुद्रा बरोबर राहते आणि स्नायूही मजबूत होतात. अशा प्रकारे बसल्यानं शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं. त्यामुळं हृदयाला कमी काम करावं लागतं.
संयुक्त वेदना प्रतिबंध
जमिनीवर बसून जेवायला गुडघे टेकावे लागतात. यामुळं गुडघ्यांचाही व्यायाम होतो. अशा प्रकारे बसल्याने सांध्यांचे स्नेहन कायम राहते. जमिनीवर बसून खाल्ल्यानं सांधेदुखीतही आराम मिळेल.
रक्त परिसंचरण ठीक आहे
जमिनीवर योग्य मुद्रेने बसून जेवल्यानं रक्ताभिसरण सुरळीत होतं आणि रक्तवाहिन्यांमधील ताण दूर होतो. हृदयविकाराच्या रुग्णांसाठी अशा प्रकारे खाणं फायदेशीर आहे.
वजन नियंत्रित राहील
जमिनीवर बसून जेवताना तुमची पचनक्रिया नैसर्गिक स्थितीत असते. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips