नवी दिल्ली, 18 मार्च : सकाळी रिकाम्या पोटी (empty stomach) आपण काय खातो, यावर आपला दिवस कसा जाणार हे ठरू शकतं. रिकाम्या पोटी खाल्ल्या जाणाऱ्या गोष्टींचा आरोग्यावर लगेच चांगला-वाईट परिणाम दिसून येतो. सकाळी चांगला नाष्टा करणंही महत्त्वाचं आहे. अनेकजण वजन वाढू नये म्हणून सकाळचा नाश्चा करत नाहीत पण ते योग्य नाही. तसेच सकाळी रिकाम्या पोटी अनेकांना अॅसिडिटी, पोटदुखी, उलट्या आणि रक्तातील साखरेची समस्या उद्भवते. सकाळी नेमक्या कोणत्या गोष्टी खाऊ नयेत याविषयी अनेकांना नीट माहीत नाही. त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या रिकाम्या पोटी (These things should not be eaten on an empty stomach) अजिबात खाऊ नयेत. रिकाम्या पोटी कधीही दारू-अल्कोहोल पिऊ नये झी न्यूज ने दिलेल्या बातमीनुसार, सकाळी रिकाम्या पोटी दारू प्यायल्यास तब्येत बिघडू शकते. असे मानले जाते की रिकाम्या पोटी दारू प्यायल्यानं ती आपल्या रक्तप्रवाहात जाते. त्यामुळे ते संपूर्ण शरीरात पसरते आणि त्यामुळे ब्लड वेसल्स फुगु शकते. यामुळे आपल्या नाडीचा दर (पल्स रेट) घसरण्याची शक्यता असते. यामुळे आपल्याला किडनी, फुफ्फुस, यकृताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे रिकाम्या पोटी दारू न पिण्याचा प्रयत्न करा. कार्बोनेटेड पेय शीतपेयांचे सेवन करणे आरोग्यासाठी नेहमीच चांगले नसते. सकाळी रिकाम्या पोटी शीतपेय किंवा सोडा पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे पोटात अॅसिडिटी होऊ शकते. याशिवाय रिकाम्या पोटी शीतपेय प्यायल्यास पोट फुगण्याची समस्या देखील होऊ शकते. याशिवाय अन्ननलिकेमध्ये कर्करोगाचा धोकाही वाढू शकतो. लिंबूवर्गीय फळे संत्री आणि लिंबू देखील सकाळी रिकाम्या पोटी खाऊ नयेत. त्याचाही कार्बोनेटेड पदार्थासारखाच प्रभाव असतो. या गोष्टींमुळे गॅस वाढवणारी रसायने तयार होतात. त्यामुळे अॅसिडिटी वाढते. तथापि, त्यांच्यामध्ये असलेले अनेक अँटिऑक्सिडंट्स आपल्याला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. रिकाम्या पोटी खरेदीला जाऊ नये याशिवाय रिकाम्या पोटी खरेदी कधीही करू नये. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिकाम्या पोटी असल्यानं आपण अधिक सामान खरेदी करू शकतो. त्यामुळे कधीही रिकाम्या पोटी खरेदीला जाण्याचा प्रयत्न करू नये, चांगला नाष्टा करून बाहेर पडावे. हे वाचा - अंघोळ करताना होणाऱ्या या चुका टाळा; तुमच्या Natural beautyवर होईल असा परिणाम रिकाम्या पोटी कॉफी नको आपण अनेक लोकांना पाहिलं असेल ते सकाळी रिकाम्या पोटी कॉफी पिण्यास सुरुवात करतात. रिकाम्या पोटी कॉफी किंवा चहा प्यायल्यास अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपला पूर्ण दिवस खराब होतो. हे वाचा - या 5 डाळींमधून मिळतं मुबलक प्रोटीन; पिळदार बॉडी बनवण्यासाठी असा करा उपयोग रिकाम्या पोटी च्युइंगम चघळण्याचे तोटे च्युइंगम चघळण्याची अनेकांना सवय असते. मात्र, तुम्हालाही सकाळी रिकाम्या पोटी च्युइंगम चघळण्याची सवय असेल तर ती वेळीच बदलावी लागेल. कारण रिकाम्या पोटी च्युइंगम चघळल्याने आपल्या पोटात पाचक ऍसिड तयार होऊ लागतं. या पाचक ऍसिडमुळे रिकाम्या पोटी ऍसिडिटीपासून अल्सरपर्यंत अनेक समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे रिकाम्या पोटी च्युइंगम न चघळणं चांगलं. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.