नवी दिल्ली, 18 मार्च : डाळी (Pulses) हा भारतीय आहारातील मुख्य घटक आहे. कुठल्या ना कुठल्या स्वरूपात प्रत्येक घरात डाळींचा वापर केला जातो. डाळी वेगवेगळ्या प्रकारे तयार करून खाल्ल्या जातात. पराठे, पकोडे, पॅनकेक, चीला, खिचडी इत्यादींसाठी डाळी वापरल्या जातात. कित्येक घरांमध्ये दररोज दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात काही डाळी खाल्ल्या जातात. फायबर, लेक्टीन्स आणि पॉलिफेनॉल सारख्या आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या कडधान्यांमुळे हृदयविकार, लठ्ठपणा, मधुमेह आणि काही कर्करोगाचा धोका कमी (High Protein Lentils) होतो. मधुमेह असलेल्या लोकांनी डाळी खाल्यानं त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाणही कमी होतं. पिळदार बॉडी बनवण्यासाठीही आहारात या डाळींचा समावेश फायदेशीर ठरतो. याविषयी आज तक ने बातमी दिली आहे. 1. उडदाची डाळ किंवा काळी मसूर उडदाची डाळ सर्वात पौष्टिक डाळींपैकी एक आहे. फॅट आणि कमी कॅलरीजशिवाय भरपूर पोषक घटक यात आहे. उडदाची डाळ पचन सुधारण्यास मदत करते, प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी 3 चा चांगला स्रोत आहे. त्यामुळे हाडे मजबूत राहतात, ऊर्जा मिळते, हृदयाचे आरोग्य सुधारते. 100 ग्रॅम उडीद डाळीमध्ये सुमारे 350 कॅलरीज आणि 24 ग्रॅम प्रथिने आढळतात. 2. चना डाळ, हरभरा डाळ प्रथिने आणि फायबरने समृद्ध हरभरा डाळ अनेक घरांमध्ये वापरली जाते. या डाळीपासून बेसन बनवले जाते, ज्यापासून विविध पदार्थ बनवता येतात. ही डाळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. एक कप हरभरा डाळीत पुरेशा प्रमाणात प्रथिने, लोह, कॅल्शियम आणि पोटॅशियम मिळतं. चणा डाळ हृदय आणि मधुमेहासाठी खूप चांगली मानली जाते. पोषणतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि चयापचय वाढते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 100 ग्रॅम हरभरा डाळीमध्ये सुमारे 250 कॅलरीज, 13 ग्रॅम प्रथिने आढळतात. 3. तूर डाळ तूर डाळ वनस्पति प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे. फायबर, फॉलिक अॅसिड, लोह आणि कॅल्शियम समृद्ध या पिवळ्या डाळीत हे चांगले कार्ब असतात. मधुमेह आणि हृदयविकाराने ग्रस्त लोकांसाठी तूर डाळ हे सुपरफूड आहे. तूर डाळीमध्ये मॅग्नेशियम, मॅंगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, जस्त यासोबतच जीवनसत्त्वे सी, ई, के आणि बी कॉम्प्लेक्स भरपूर असतात. यासोबतच 110 ग्रॅम तूर डाळीमध्ये 12.56 प्रोटीन, 206 कॅलरीज, 3.39 ग्रॅम फॅट असते. हे वाचा - तुम्हाला माहीत आहे का? वयानुसार महिला आणि पुरुषांमध्ये Blood Pressure किती असावं 4. मूग डाळ मूग डाळ हे सर्वात प्रसिद्ध सुपरफूडपैकी एक आहे. तुमच्या आहारात मूग डाळीचा नियमित समावेश केल्यास अनेक फायदे होऊ शकतात. रक्ताभिसरण वाढवण्यासोबतच त्वचेचे आरोग्य वाढवते. यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे वजन कमी करण्यातही खूप मदत होते. पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह भरपूर असल्याने, ते हाडे मजबूत करते आणि स्नायू पेटके येण्याचा त्रासही कमी होतो. यात 103 ग्रॅम मूग डाळ 8 ग्रॅम प्रोटीन आणि 118 कॅलरीज असतात. हे वाचा - चालण्याचा व्यायाम करताना अनेकांकडून ही चूक होते; फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक 5. मसूर डाळ किंवा लाल मसूर दक्षिण-भारतीय घरांमध्ये लाल मसूर किंवा मसूर डाळ मोठ्या प्रमाणात वापरली जाते. मसूर लठ्ठपणा कमी करण्यास खूप मदत करते. मसूरमध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगले असते. 100 ग्रॅम मसूर डाळीमध्ये 116 कॅलरीज आणि 9 ग्रॅम प्रथिने असतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.