Home /News /lifestyle /

आई बनलेल्या कोणत्याही महिलेला इरिटेट करतात या 5 गोष्टी; त्यांना असं कधीच म्हटलं नाही पाहिजे

आई बनलेल्या कोणत्याही महिलेला इरिटेट करतात या 5 गोष्टी; त्यांना असं कधीच म्हटलं नाही पाहिजे

जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते तेव्हा तिला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. आई झाल्यानंतरही त्रास सहन करण्याची प्रक्रिया दीर्घकाळ सुरू असते. स्त्रीला अनेक शारीरिक समस्या (Physical problems) तर असतात.

    नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : आई होण्याचा प्रवास कोणत्याही महिलेसाठी सोपा नसतो. जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते तेव्हा तिला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. आई झाल्यानंतरही त्रास सहन करण्याची प्रक्रिया दीर्घकाळ सुरू असते. स्त्रीला अनेक शारीरिक समस्या (Physical problems) तर असतातच, शिवाय मुलाची जबाबदारी (Responsibility of the child), रात्री झोप न लागणं इत्यादी कारणांमुळे तिचा मानसिक स्वभावही रागीट आणि चिडचिडा होऊ शकचो. विशेषत: ज्या महिला पहिल्यांदाच माता झाल्या आहेत, त्यांना या आधी कोणताही अनुभव नसल्यामुळं त्यांना अधिक समस्यांना सामोरं जावं लागतं. अशा परिस्थितीत, कोणत्याही महिलेशी बोलण्यापूर्वी शब्द अतिशय काळजीपूर्वक वापरायला पाहिजेत. कारण काही गोष्टी स्त्रीला मानसिक त्रास (Mental distress) देत राहतात. तू खूप जाड झालीस आई झाल्यानंतर बहुतेक महिलांचे वजन वाढते, त्यामुळे त्यांना आधीच खूप टेन्शन असते, अशा वेळी कोणी येऊन त्यांच्या वाढलेल्या वजनाबद्दल बोलले तर चिडचिड खूप वाढते. त्यामुळे असं कुणाशी बोलू नये किंवा शारीरिक बदलांवर चर्चा करू नये. फीडिंगबद्दल ज्ञान देत राहणे आपल्या अवती-भोवती किंवा घरातीलही अनेक स्त्रिया विनाकारण निरुपयोगी ज्ञान देत असतात, जसे की मुलाला जास्त खाण्याची सवय लावू नका किंवा त्याचा आहार कमी करू नका आणि आता बाहेरचे अन्न देणे सुरू करा, इत्यादी. खरंतर आईला स्वतःला माहीत असतं की तिच्या मुलाला काय आवश्यक आहे. आता योग्य वैद्यकीय सल्ला मिळत असतो, तसेच पुढे जाऊन इंटरनेटवरूनही योग्य माहिती मिळत असते, आणि एक माता त्याच्या लाडक्यासाठी काय हवं नको ते जाणते. अशा स्थितीत तिला चुकीचे ज्ञान दिलेलं आवडत नाही. त्यामुळे मुलाच्या संगोपनाची जबाबदारी तुम्ही आईवर टाकलेली बरी. तू खूप चिडचिड करतेस जेव्हा एखादी स्त्री पहिल्यांदाच आई बनते तेव्हा मुलाच्या संगोपनात तिची संपूर्ण दिनचर्या विस्कळीत होते. तिला नीट झोपही मिळत नाही. अशा स्थितीत तिची चिडचिड होणे साहजिक आहे. पण, याचा विचार न करता घरातील लोक काहीही बोलत असतील तर चिडचिड जास्तच वाढते. हे वाचा - Cold Water : पाणी पिताना अनेकजण ही एक चूक करतात; नंतर अनेक आरोग्य समस्या मागे लागतात नोकरी जॉईन कधी करणार? जर एखादी स्त्री नोकरी करत असेल, तर आई झाल्यानंतर तिला अनेक वेळा काही काळ नोकरी सोडावी लागते. अशा स्थितीत आपण मागं पडत असल्याची भावना तिच्या मनात आधीपासूनच असते. पण, नोकरीविषयीचा काहीतरी चुकीचा मुद्दा कुणी काढला तर चिडचिडच वाढते. हे वाचा - Skin Care Tips: नेहमीच खोबरेल तेल त्वचेसाठी फायदेशीर ठरत नसतं; त्याचे हे साईड इफेक्टही समजून घ्या दुसऱ्याच्या मुलाशी तुलना करू नका बहुतेक स्त्रियांना ही समस्या असतेच. जेव्हा त्या नवीन आईला भेटायला जातात, तेव्हा तिच्या मुलाची तुलना त्यांच्या मुलाशी करू लागतात. लक्षात ठेवा की प्रत्येक मुलाचे स्वतःचे अद्वितीय/वेगळे गुण असतात, त्यामुळे तुलना करणं योग्य नाही. यामुळे नवीन आईला वाईट वाटतं. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Lifestyle, Mother, Parents, Parents and child, Small baby

    पुढील बातम्या