मुंबई, 9 मार्च : गेल्या काही वर्षांत जीवनशैलीत मोठा बदल झाला आहे. व्यग्र जीवनशैलीमुळे अनेकांना आहार आणि व्यायामाकडे पुरेसं लक्ष देणं अशक्य झालं आहे. साहजिकच त्याचा परिणाम आरोग्यावर होताना दिसत आहे. जीवनशैलीत बदल झाल्याने हृदयविकार, डायबेटीसच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हृदयविकार, डायबेटीसचं निदान झाल्यावर वेळीच उपचार घेतले नाहीत तर हे आजार नियंत्रणाबाहेर जाऊन त्याचा परिणाम किडनी, डोळे, मज्जासंस्था आदींवर होतो. किडनी हा शरीरातला अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. रक्त शुद्धीकरणात किडनीजची भूमिका महत्त्वपूर्ण असते. हृदयविकार, डायबेटीस किंवा अन्य कोणत्याही आजारामुळे किडनीज निकामी होऊ शकतात. किडनीज खराब झाल्यास त्याची वेगवेगळी लक्षणं शरीरावर दिसू लागतात. सूज येणं हे त्यापैकी सर्वांत महत्त्वाचं लक्षण मानलं जातं. पाय, घोटे, तळवे आदी भागांत सूज येऊ लागते.
क्षणभर विश्रांतीसाठी तुम्हीही खुर्चीतच छोटी झोप काढता का? मग याचे परिणामही वाचायाचा परिणाम साहजिकच संबंधित रुग्णाच्या जीवनशैलीवर होतो. त्यामुळे अशी लक्षणं दिसताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार घेणं गरजेचं आहे. किडनी फेल्युअर म्हणजे काय, किडनी निकामी कशी होते, किडनी निकामी झाल्यास त्याची कोणती लक्षणं शरीरात दिसतात याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.
प्रश्न : खराब झालेली किडनी पुन्हा बरी होऊ शकते का? उत्तर : किडनी दोन प्रकारे खराब होऊ शकते. अॅक्यूट अर्थात अचानक किडनी फेल होणं हा पहिला प्रकार होय. दुसऱ्या प्रकारात क्रॉनिक अर्थात हळूहळू किडनी खराब होते. अॅक्यूट विकारात किडनी खराब झाल्यास ती पुन्हा बरी होणं शक्य असतं; पण क्रॉनिक विकारात किडनी पुन्हा बरी होत नाही. प्रश्न : किडनीशी संबंधित आजारामध्ये शरीरात कोणती लक्षणं दिसू शकतात? उत्तर : किडनीशी संबंधित आजारात पायांना सूज येणं, डोळ्यांखाली सूज येणं, धाप लागणं, भूक कमी होणं, उलट्या होणं, अशक्तपणा जाणवणं, रात्री वारंवार लघवीला जावं लागणं, ब्लड प्रेशर वाढणं ही प्रमुख लक्षणं दिसतात. प्रश्न : किडनीच्या समस्येमुळे सूज येते का? उत्तर : किडनीचं आरोग्य बिघडलं असेल तर किडनी शरीरातले विषारी पदार्थ पूर्णपणे बाहेर टाकू शकत नाही. परिणामी ते घटक शरीरात जमा होऊ लागतात. त्याचप्रमाणे, शरीरातून अतिरिक्त सोडियम बाहेर टाकलं जात नाही, तेव्हा ते पाय, घोटे आणि तळव्यांमध्ये जमा होतं आणि सूज येते.
Health Tips : हार्ट अटॅक आणि स्ट्रोक टाळण्यासाठी तुमच्या आहारातून आत्ताच काढून टाका हे पदार्थसुरुवातीच्या लक्षणांपैकी एक म्हणजे घोटे, पाय आणि टाचांच्या जवळ सूज येते. या ठिकाणी हलकासा दाब दिला असता सुजेमुळे खड्डा पडतो त्याला पीटिंग एडेमा असं म्हणतात. किडनी खराब होऊ लागते, तसं शरीरात सोडियम साठत जातं आणि त्यामुळे पोटऱ्या आणि घोट्याला सूज येते. शरीरावर, त्यातही प्रामुख्याने पायांवर वारंवार सूज येत असेल किंवा ती कायम राहत असेल तर तातडीने वैद्यकीय तपासणी करणं गरजेचं आहे.