जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / काय आहे हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी? तज्ज्ञांनी सांगितले डोळ्यांवर कसा होतो परिणाम

काय आहे हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी? तज्ज्ञांनी सांगितले डोळ्यांवर कसा होतो परिणाम

काय आहे हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी? तज्ज्ञांनी सांगितले डोळ्यांवर कसा होतो परिणाम

हाय ब्लड प्रेशरमुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. हाय ब्लड प्रेशरला हायपरटेन्शन असंही म्हणतात. यामुळे डोळ्यांवरही परिणाम होण्याची शक्यता असते.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 20 फेब्रुवारी : उच्च रक्तदाब अर्थात हाय ब्लड प्रेशर ही हृदयाशी संबंधित समस्या आहे. हाय ब्लड प्रेशरमुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. हाय ब्लड प्रेशरला हायपरटेन्शन असंही म्हणतात. यामुळे डोळ्यांवरही परिणाम होण्याची शक्यता असते. तसा हायपरटेन्शमुळे डोळ्यांवर विपरित परिणाम झाला तर त्याला हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी असं म्हणतात. गुजरातमधील आणंद येथील शंकरा नेत्र रुग्णालयातील व्हिट्रोरेटिनल सेवा कन्सल्टंट डॉ. निधी जैन यांनी हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथीवर मार्गदर्शन केलं आहे. या समस्येची कारणं, लक्षणं या विषयीची माहिती देखील डॉ. जैन यांनी दिली आहे. डॉ. निधी जैन गेली सहा वर्षं प्रॅक्टिस करत असून, शंकरा नेत्र रुग्णालयात गेल्या चार वर्षापासून कार्यरत आहेत.

    मोतीबिंदू ऑपरेशननंतर डोळ्यांची अशी घ्या काळजी, तज्ज्ञांनी दिल्या महत्त्वाच्या टिप्स

    हाय ब्लड प्रेशरची (हायपरटेन्शन) लक्षणं स्पष्टपणे दिसण्यापूर्वी शरीरातील अवयवांचं नुकसान झालेलेंअसतं. अनियंत्रित रक्तदाबामुळे अपंगत्व येऊ शकतं आणि डोळ्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या लहान, नाजूक रक्तवाहिन्यांचं नुकसान होऊ शकतं. हायपरटेन्शनमुळे डोळ्यांतील पडद्यामधील रक्तवाहिन्यांचं नुकसान होऊ शकतं. डोळ्यांच्या आतील म्हणजे ज्यामुळे प्रतिमा दिसतात अशा भागाचे नुकसान होते. याला हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी म्हणतात. हाय ब्लड प्रेशर उपचारांच्या माध्यमातून वेळीच आटोक्यात आणले नाही तर शरीरावर गंभीर परिणाम होतात आणि दृष्टी धोक्यात येऊ शकते.

    News18लोकमत
    News18लोकमत

    हाय ब्लडप्रेशरमुळे तुमच्या डोळ्यांचं असं नुकसान होऊ शकतं - रेटिनातील (रेटिनोपॅथी) रक्तवाहिन्यांचं नुकसान - डोळ्याच्या आतील बाजूला असलेल्या (रेटिना) प्रकाश-संवेदनशील ऊतकांमधील रक्तवाहिन्यांचे नुकसान झाल्याने डोळ्यात रक्तस्राव होणं, दृष्टी अंधूक होणं किंवा दृष्टी कमकुवत होणं या समस्या निर्माण होऊ शकतात. रेटिनाला रक्त पुरवठा न झाल्यास दृष्टी अंधूक होते किंवा ती पूर्णपणे जाऊ शकते. ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवणं हा हायरटेन्सिव्ह रेटिनोपॅथीवर उपचार करण्याचा एकमेव मार्ग आहे. रेटिनाखाली द्रव जमा होणं – या मुळे दृष्टीदोष निर्माण होऊ शकतो. नर्व्ह डॅमेज - रक्तप्रवाह ब्लॉक झाल्यास ऑप्टिक नर्व्हला हानी पोहोचते. त्यामुळे या भागाचं अंशतःनुकसान होतं किंवा संपूर्ण दृष्टी जाऊ शकते. स्ट्रोक आणि त्याचा डोळ्यावर होणारा परिणाम - हाय ब्लड प्रेशरमुळे स्ट्रोक होऊ शकतो. त्यामुळे ऑप्टिक नर्व्ह खराब होऊ शकते किंवा पटलावर निर्माण होणाऱ्या प्रतिमांवर प्रक्रिया करणाऱ्या मेंदूतील भागाचं नुकसान होऊ शकतं. हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथीची लक्षणं कोणती ? - सामान्यतः हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथीची कोणतीही लक्षणं ठळकपणे दिसत नाहीत. मात्र डोळ्यांच्या नियमित तपासणीत ही लक्षणं आढळून येतात. हायपरटेन्शच्या तीव्र लक्षणांमध्ये डोकेदुखी आणि अंधूक दृष्टी यांचा समावेश असू शकतो. हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथीवर कोणते उपचार केले जातात? हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथीवर उपचार करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवणं होय. मीठ कमी खाणं, नियमित व्यायाम आणि मेडिटेशन अशा निरोगी जीवनशैलीच्या माध्यमातून ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. डायबिटीजमुळे जाऊ शकते दृष्टी! डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टींची घ्या काळजी सामान्य प्रौढ, डायबेटिस नसलेल्या लोकांपैकी सुमारे 10 टक्के लोकांमध्ये सौम्य हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथीची लक्षणं वारंवार दिसतात, असं अभ्यासांमधून सिद्ध झालं आहे. हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथीच्या लक्षणांचा संबंध अवयवांच्या नुकसानीच्या (लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी, रिनल इम्पेअरमेंट) निर्देशकांशी असतो. तसेच भविष्यातील कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, स्ट्रोक आणि हृदय तसेच रक्तवाहिन्यांशी संबंधित मृत्यू यासारख्या क्लिनिकल इव्हेंटचे ते सूचक असू शकतं. हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथीच्या स्थितीशी आरोग्याचे विविध घटक संबंधित आहेत आणि डोळ्यांशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवण्यापूर्वी दिसणाऱ्या शारीरिक समस्या तातडीने कशा कमी करता येतील याबाबत उपाययोजना करणं आवश्यक आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात