जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हिवाळ्यात केसगळती थांबवण्यासाठी उत्तम उपाय आहे ABC ज्यूस, त्वचेसाठीही फायदेशीर

हिवाळ्यात केसगळती थांबवण्यासाठी उत्तम उपाय आहे ABC ज्यूस, त्वचेसाठीही फायदेशीर

केसगळती थांबवण्यासाठी उत्तम उपाय आहे ABC ज्यूस

केसगळती थांबवण्यासाठी उत्तम उपाय आहे ABC ज्यूस

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आणि पोषक तत्वांच्या अभावामुळे केस गळतीचे प्रमाण वाढले आहे. कोणत्याही वयातील व्यक्तींचे केस गळणे हल्ली सामान्य झाले आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 18 जानेवारी : बदलती जीवनशैली आणि कामाच्या ताणतणावामुळे माणसांच्या आरोग्यावर परिणाम तर होतोच आहे. पण यामुळे आपलय केसांवरही वाईट परिणाम होतोय. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आणि पोषक तत्वांच्या अभावामुळे केस गळतीचे प्रमाण वाढले आहे. कोणत्याही वयातील व्यक्तींचे केस गळणे हल्ली सामान्य झाले आहे. मात्र यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. कारण आम्ही तुम्हाला केस गळती थांबवण्याचा एक अत्यंत स्वादिष्ट, पौष्टिक आणि सोपा उपाय तुम्हाला सांगणार आहोत. हा उपाय म्हणजे आयुर्वेदिक ABC ज्यूस. हरजिंदगीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, हा ज्यूस केवळ केस गळणेच थांबवत नाही तर कोरडी त्वचा, शरीरातील हिमोग्लोबिन लेव्हल आणि एकूण पोषण सुधारण्यासही मदत करते.

काय सांगता! हिवाळ्यात पाण्याविना केस करता येतील स्वच्छ, पाहा भन्नाट आयडिया

हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे केस गळणे, अशक्तपणा, थकवा आणि कमजोर रोगप्रतिकारशक्ती अशा समस्या निर्माण होतात. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.दीक्षा भावसार यांनी ही माहिती इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर केली आहे. एबीसी ज्यूस हे सफरचंद, बीटरूट आणि गाजर यांचे मिश्रण आहे. हे एक डिटॉक्स ड्रिंक आहे. या ज्यूसमध्ये झिंक, पोटॅशियम, मॅन्गनीज आणि व्हिटॅमिन ए, बी6, सी आणि इतर अनेक जीवनसत्त्वे यांसारख्या आवश्यक पोषक तत्व आहेत, तुमच्या शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे.

News18लोकमत
News18लोकमत

ABC ज्यूस बनवण्यासाठी लागणारे साहित्य आवळा - 3, उकडलेले बीट - 1, उकडलेले गाजर - 2, मूठभर कोथिंबीर, कढीपत्ता - 7 ते 8 पानं, मूठभर पुदिन्याची पानं, आले - 1 तुकडा, अर्धे लिंबू (आवडत असल्यास), मनुका (गोडव्यासाठी), मीठ - 1 टीस्पून. हेअर स्ट्रेटनिंग करायला आवडतं? पण जरा जपून.. कॅन्सरचे बनू शकते कारण ABC ज्यूस बनवण्याची पद्धत ABC ज्यूस बनवण्यासाठी सर्व आवश्यक साहित्य कापून घ्या. नंतर ते सर्व मिक्सरच्या भांड्यात टाका आणि त्यात १ ग्लास पाणी घाला. हे मिश्रण मिक्सरमध्ये चांगले बारीक करून घ्या. चांगले बारीक झाल्यानंतर तुमचा ज्यूस एक ग्लासमध्ये काढून पिण्यासाठी तयार होतो. यावर लिंबू आणि मीठ घाला. मात्र ज्या लोकांना अर्थ्रायटिसचा त्रास आहे त्यांनी यामध्ये आवळा आणि लिंबू टाळावे. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात