जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / 'तिचं' मन जिंकायचंय? एवढंही कठीण नाही, करून बघा या 4 गोष्टी

'तिचं' मन जिंकायचंय? एवढंही कठीण नाही, करून बघा या 4 गोष्टी

relationship secrets

relationship secrets

स्त्रीचं मन (Mind) हे एक अनाकलनीय कोडं आहे. तिच्या मनात नेमकं काय चाललं आहे, हे कोणालाच ओळखता येत नाही आणि लवकर समजतही नाही, असं अनेक पुरुषांचं मत असतं. दोघांमधील नातं निखळ आणि घट्ट राहावं, यासाठी पुरुषांना महिलांच्या मनातल्या काही गोष्टींची जाण असणं गरजेचं आहे. त्यासाठीच जाणून घ्या काही टिप्स

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 8 मार्च:  स्त्रीचं मन (Mind) हे एक अनाकलनीय कोडं आहे. तिच्या मनात नेमकं काय चाललं आहे, हे कोणालाच ओळखता येत नाही आणि लवकर समजतही नाही, असं अनेक पुरुषांचं मत असतं. दुसरीकडे आपल्या जोडीदारानं आपली काळजी घ्यावी, आपल्याला काय हवं नको ते पाहावं, असं प्रत्येक महिलेला वाटतं. पण तिच्या मनातल्या या भावना जोडीदाराला (Partner) समजतातच असं नाही. यामुळे अनेकदा नात्यात (Relation) गैरसमज किंवा अगदी कटूता आल्याचंदेखील दिसतं. पुरुषांच्या तुलनेत महिला थेट भावना (Feelings) व्यक्त करताना दिसत नाहीत. आपण न सांगता समोरच्या व्यक्तीनं आपल्या मनातलं ओळखावं अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे अशा स्थितीत नातं निखळ आणि घट्ट राहावं, यासाठी पुरुषांना महिलांच्या मनातल्या काही गोष्टींची जाण असणं गरजेचं आहे. या विषयीची माहिती `आज तक`ने प्रसिद्ध केली आहे. रिलेशनशीपमध्ये एकमेकांबद्दलचा विश्वास, प्रेम आणि मनं जुळणं महत्वाचं असतं. परंतु, बऱ्याचदा नात्यात गैरसमज निर्माण झाल्याचं दिसून येतं. अर्थात यामागे दोघंही कारणीभूत असतात. महिला जोडीदारानं आपल्याला नेमकं काय अपेक्षित आहे, काय हवं आहे, हे स्पष्टपणे न सांगितल्यानं पुरुष जोडीदाराला तिच्या मनातल्या काही गोष्टी समजून घेणं मुश्किल जातं. त्यामुळे तो तिचं मन जिंकण्यात अपयशी ठरतो. पण, पुरुषांनी महिलांच्या मनातल्या काही गोष्टी जाणून घेत, त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला तर नातं अधिक खुलतं. यासाठी काही विशेष टिप्स आज आम्ही तुम्हाला देत आहोत. अनेकदा चवच समजत नाही असं होतंय का? 43 टक्के मधुमेहींना खारट-गोडाचा अंदाजच येईना जे पुरुष स्वतःला जास्त स्मार्ट (Smart) किंवा जास्त ज्ञानी आणि इतरांना मूर्ख समजण्याची चूक करतात, अशा पुरुषांविषयी महिलांच्या मनात चिड असते. अशा पुरुषांपासून महिला दूर राहणं पसंत करतात. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या जोडीदाराचं मन जिंकायचं असेल तर तिला कमी बुद्धिमान समजण्याची चूक टाळा. रिलेशनशीपमध्ये काही पुरुष शारीरिक संबंध (Physical Relation) ठेवण्याची खूप घाई करतात. पण महिलांच्या बाबतीत असं अजिबात होत नाही. त्यांची शारीरिक संबंध ठेवण्याची पद्धत पुरुषांपेक्षा काहीशी वेगळी असते. शारीरिक संबंध ठेवण्याआधी समोरच्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेम असायला हवं, असं महिलांना वाटतं. महिलांना त्यांची काळजी (Care) घेणारे पुरुष जास्त आवडतात. विशेषतः जेव्हा त्या एखाद्या गोष्टीमुळे दुःखी असतात, तेव्हा कुणीतरी आपली काळजी घ्यावी असं त्यांना वाटतं. त्यामुळे तुमची जोडीदार दुःखी असताना तिची जर तुम्ही काळजी घेतली तर तिला नक्कीच छान वाटेल. जेव्हा तुम्ही एखाद्याची जास्त काळजी घेता तेव्हा ती व्यक्ती तुमच्यावर जास्त प्रेम करू लागते. महिलांना त्यांची स्तुती ऐकायला जास्त आवडतं. त्यामुळे जे पुरुष प्रत्येक प्रसंगी स्तुती करतात, ते महिलांना अधिक आवडतात. जे पुरुष वारंवार वादविवाद करतात, भांडणं करतात, एखाद्या गोष्टीत खोलवर जात चांगले नातेसंबंध बिघडवतात, असे पुरुष महिलांना बिल्कुल आवडत नाहीत. महिला पुरुषांचं बाह्यरुप नव्हे तर त्यांचे मन कसं आहे हे पाहतात. त्यांना वैचारिक पातळी चांगली असलेले आणि संवेदनशील (Sensitive) पुरुष आवडतात. त्यामुळे तुम्ही जोडीदारापासून तुमच्या कोणत्याही गोष्टी लपवू नका, तुम्ही जसे आहात तसेच तिच्यासमोर राहण्याचा प्रयत्न करा. विचित्र आजार! खाद्यपदार्थ दिसताच कोसळतं रडू; खातानाच ढसाढसा रडते ही व्यक्ती जर महिला मनातील एखादी गोष्ट पुरुषांशी बोलत असतील तर त्यांनी ते लक्षपूर्वक ऐकावं असं महिलांना वाटतं. बोलण्याकडं दुर्लक्ष करणारे पुरुष महिलांना अजिबात आवडत नाहीत. आपले प्रश्न त्यांनी स्वतः सोडवावेत असं महिलांना वाटत असतं. आपली प्रेमकथा (Love Story) एखाद्या परीकथेसारखी (Fairy Tale) असावी, असं प्रत्येक महिलेचं स्वप्न असतं. अशा स्थितीत अनेक महिलांना प्रेम व्यक्त करण्यासाठी आधुनिकतेऐवजी पारंपारिक पद्धत आवडते. तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी खास करावं, सरप्राईज देण्याचं प्लॅनिंग करावं, असं महिलांना वाटतं. महिलांना रोमँटिक डेटवर (Romantic Date) जायला आवडतं. तुम्ही तुमच्या जोडीदाराला स्पेशल वाटावं यासाठी प्रेमाशी संबंधित काही पुस्तकेही भेट देऊ शकता. ही सगळी काळजी घेतली तर पुरूष महिलांचं मन जिंकू शकतील.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात