मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

हा असा कसला विचित्र आजार! खाद्यपदार्थ दिसताच कोसळतं रडू; खातानाच ढसाढसा रडते ही व्यक्ती

हा असा कसला विचित्र आजार! खाद्यपदार्थ दिसताच कोसळतं रडू; खातानाच ढसाढसा रडते ही व्यक्ती

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

समोर खाद्यपदार्थ दिसताच तोंडातून लाळ नाही तर या व्यक्तीच्या डोळ्यातून येतं पाणी.

    बीजिंग, 05 मार्च : सामान्यपणे जेव्हा एखाद्या व्यक्तीला वेदना होत असात, ती दुःखात असते, भावुक होते तेव्हा ती रडते किंवा एखादी व्यक्ती आनंदात असताना किंवा हसता हसताही तिच्या डोळ्यातून पाणी येतं. पण कधी कुणाला खाताना तुम्ही रडताना पाहिलं आहे का?  (Man cry while eating)  चीनमधील एका व्यक्ती अशी आहे, जी खाताना रडते (Chinese man starts crying seeing food). तसं आपण दुःखात, वेदनेत असलो की आपल्याला खाणंपिणंही जात नाही. आपली भूक मरते आणि कुणी काही खायला दिलं तर तसं थोडं रडू येतं. पण या व्यक्तीच्या बाबतीत तसं काहीच नाही. फक्त समोर खाद्यपदार्थ दिसताच या व्यक्तीला रडू कोसळतं. म्हणजे एरवी खाद्यपदार्थ पाहिलं की आपल्या तोंडातून लाळ येते पण या व्यक्तीच्या डोळ्यातून पाणी येतं. ऑडिटी सेंट्रल वेबसाईटवर चीनमधील या व्यक्तीची माहिती देण्यात आली आहे. रिपोर्टनुसार या व्यक्तीचं नाव झँग (Zhang) आहे. जेवताना त्याला रडायला येतं. आपल्याला काहीतरी समस्या आहे, हे त्याला वाटत होतं म्हणून या समस्येमुळे तो हॉटेलमध्येही खाण्याासाठी जात नसे. कारण जेव्हा तो खाताना रडायचा तेव्हा लोक त्याच्याकडे पाहत राहायचे आणि त्याला लाज वाटायची. हे वाचा - ...अन् कॅफिन पावडर ठरली 'विष'! सप्लिमेंट ड्रिंक पिताच तरुणाचा मृत्यू त्याने वुहानच्या रुग्णालयात आपली वैद्यकीय तपासणी करून घेतलं. त्यावेळी जे कारण समजलं ते पाहून डॉक्टरही शॉक झाले. या व्यक्तीला समजलं की खाताना रडणं हा त्याचा स्वभाव नाही तर त्याला असलेला हा एक आजार आहे. आजारामुळे त्याला अशी समस्या होत होती. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार त्याला क्रोकोडाइल सिंड्रोम (Crocodile syndrome). हा दुर्मिळ सिंड्रोम (Rare syndrome)  आहे. डॉक्टर चेंग यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की, हा सिंड्रोम या व्यक्तीच्या फेशिअल पॅरालिसिसच्या समस्येशी संबंधित आहे. चेहऱ्यावर लकवा मारल्यानंतर जेव्हा ते बरे होत होते तेव्हा त्याच्या डोळ्यांच्या लॅक्रिमल ग्लँडवर दुष्परिणाम झाला आहे. रिकव्हरीवेळी चेहऱ्यावरील नसांची दिशा बदलली, ज्यामुळे खाद्यपदार्थांचा सुगंध येताच तोंडातील लाळेऐवजी त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात. हे वाचा - बापरे! ही मुलगी आहे की...; हॉरर फिल्मसारखा रिअल Video Viral; पाहूनच फुटेल घाम ऑडिटी सेंट्रल वेबसाइटने चिनी मीडियाचा हवाला देत हे वृत्त दिलं आहे. त्यामुळे यामध्ये कितपत तथ्य आहे याचा दावा न्यूज 18 लोकमत करत नाही. ही बातमी व्हायरल होते आहे आणि चर्चेत आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: China, Health, Lifestyle, Rare disease

    पुढील बातम्या