जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / कॅल्शियम युक्त आहे मखाना; त्याचे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल चकित

कॅल्शियम युक्त आहे मखाना; त्याचे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल चकित

कॅल्शियम युक्त आहे मखाना; त्याचे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल चकित

मखाना (Makhana) आरोग्यासाठी खूप फायदेशीर (Benefits) असतो. सकाळी रिकाम्या पोटी (Empty Stomach) हा खाल्ल्यास आरोग्याच्या दृष्टीने विविध फायदे (Health benefits) मिळतात.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

     मुंबई, जानेवारी-   मखाना    (Makhana)   आरोग्यासाठी खूप फायदेशीर (Benefits) असतो. सकाळी रिकाम्या पोटी (Empty Stomach) हा खाल्ल्यास आरोग्याच्या दृष्टीने विविध फायदे   (Health benefits)   मिळतात. तुपात भाजून सकाळी मूठभरमखाना खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियम, मॅग्नेशियम, कार्ब्स आणि प्रोटिनची कमतरता लगेच पूर्ण होते. हे ग्लुटेन फ्री असतात. सकाळी मखाना     खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल, फॅट व सोडियमचे प्रमाण नियंत्रणात राहते, आणि हाडे मजबूत होतात. याशिवाय रक्तातील साखरेची पातळीही   (blood sugar level)   नियंत्रणात राहते. ओन्ली माय हेल्थ वेबसाइटवरील लेखानुसार, मखाण्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, प्रोटिन आणि लोह मुबलक प्रमाणात असते. याशिवाय यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. मखानामध्ये हेल्दी फॅट, फॉस्फरस, व्हिटॅमिन्स आणि कॅलरीजही मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी हे खाणं अधिक फायदेशीर ठरतं. रिकाम्या पोटी मखाणा खाण्याचे फायदे 1. हाडे मजबूत होतात- मखानामध्ये भरपूर कॅल्शियम असल्याने ते खाल्याने हाडे मजबूत होतात. हाडे दुखत असतील तर सकाळी रिकाम्या पोटी हे खाणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे सांधेदुखीमध्येही आराम मिळतो. 2. गरोदरपणात फायदेशीर- गरोदरपणात मखाना हा आई आणि बाळ दोघांसाठीही फायदेशीर आहे. हे खाल्याने गरोदर महिलांना सर्व आवश्यक पोषकतत्त्वं मिळतात. याच्या सेवनाने शारीरिक कमकुवतपणा दूर होऊन थकवा दूर होतो. 3.रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते- रिकाम्या पोटी  मखाना खाल्ल्याने रक्तातील शरीरातील साखरेची पातळी (blood sugar level) नियंत्रणात राहते. हे मधुमेहींसाठी ( diabetics) उत्तम खाद्य मानले जाते. 4. हृदयासाठी फायदेशीर- मखानामध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे हृदयासाठी फायदेशीर असतात. हृदयाशी संबंधित समस्या असतील तर तुमच्या नाश्त्यामध्ये याचा समावेश करणं फायदेशीर ठरतं. यामुळे हृदय निरोगी राहतं आणि रक्तदाब (blood pressure) नियंत्रणात राहतो. 5. वजन कमी करण्यास फायदेशीर (हे वाचा: तज्ज्ञांच्या मते टॉमेटो फळ पण तरी भाजीतच होते त्याची गणना; कारण आहे खास ) वजन कमी करायचं असेल तर मखानाचं सेवन रिकाम्यापोटी करा. यामध्ये असलेले घटक वजन कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. सकाळी रिकाम्या पोटी हे खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे भूक लवकर लागत नाही. यामुळे शरीरातील पोषक तत्त्वांची कमतरतादेखील दूर होते. 6. त्वचेसाठी फायदेशीर मखानामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटीएजिंग गुणधर्म आढळतात, ज्यामुळे त्वचा तरुण दिसते. त्वचा उजळते आणि अतिनील किरणांमुळे ( UV rays ) त्वचा खराब झाली असेल तर चांगली होण्यास मदत होते. मखाना म्हणजे पौष्टिक खाद्य. हे पॉपकॉर्न सारखे दिसते. मराठीत मखाना म्हणजे कमळाचे बीज, पण याला मखाना याच नावाने सर्वत्र ओळखले जाते. खाण्यासाठी हे पौष्टिक खाद्य असल्याने त्याचा आरोग्याच्या दृष्टीनेही चांगला फायदा होतो.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात