Home /News /lifestyle /

गालावरची खळीच नव्हे, तर या ठिकाणच्या खळ्या असतात स्त्रियांसाठी लकी; उत्तम आरोग्याचंही मानलं जातं लक्षण

गालावरची खळीच नव्हे, तर या ठिकाणच्या खळ्या असतात स्त्रियांसाठी लकी; उत्तम आरोग्याचंही मानलं जातं लक्षण

शरीरावर विशिष्ट जागी असलेल्या खळ्यांना डिंपल ऑफ व्हीनस (Dimples of Venus) असं म्हणतात. ही डिंपल्स स्त्रियांसाठी भाग्यशाली असल्याचं मानलं जातं.

नवी दिल्ली, 15 सप्टेंबर: एखाद्या स्त्रीच्या गालावरच्या खळ्या (Dimple on Cheek) समोरच्या व्यक्तीला बघताक्षणी मोहात पाडतात. स्त्रियांच्या नव्हे तर पुरुषांच्या गालावरही खळ्या असतात; पण स्त्रियांमध्ये हे प्रमाण अधिक असतं. गालावर खळ्या पडणाऱ्या स्त्रियांचं हास्य अधिकच मोहक असतं आणि त्यांचं सौंदर्यही अधिक खुलतं. गालावरच नव्हे, तर शरीरावर आणखीही एका ठिकाणी खळ्या असतात, हे मात्र अनेकांना माहीत नाही. (Myths about dimples) गालावरच्या खळ्यांप्रमाणे या खळ्या सहजपणे दिसत नाहीत. या खळ्यादेखील स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही असतात; मात्र स्त्रियांमध्ये याचं प्रमाण अधिक असतं. शरीरावर विशिष्ट जागी असलेल्या खळ्यांना डिंपल ऑफ व्हीनस (Dimples of Venus) असं म्हणतात. ही डिंपल्स स्त्रियांसाठी भाग्यशाली असल्याचं मानलं जातं. आरोग्यदृष्ट्या अशा स्त्रिया अधिक चांगल्या असतात. रत्येक व्यक्तीच्या शरीराची रचना वेगळी असते. त्यामुळे प्रत्येक स्त्रीच्या शरीरावर डिंपल ऑफ व्हीनस असतीलच असं नाही. टीव्ही नाइन हिंदी'ने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. या खळ्या सदृष छोटे खड्डे किंवा Dimple of Venus स्त्रियांच्या नितंबांच्या वर आणि कमरेच्या खालच्या भागावर असतात. त्यामुळे याला बॅक डिंपल (Back Dimple), डफी डिंपल (Duffy Dimple), बट डिंपल (Butt Dimple) किंवा वेनेरियल डिंपल असंही म्हणतात. साधारण आपण जिथे पँट बांधतो, तिथे हे डिंपल असतात. स्त्रियांमध्ये असणाऱ्या या डिंपल्सकडे सेक्स सिम्बॉल म्हणून पाहिलं जातं. आज-काल हे डिंपल्स खुलेआम दाखवण्याची फॅशन रूढ झाली असून, त्यावर पिअर्सिंग (Piercing on dimples of venus) करण्याचाही ट्रेंड जोरात आहे. 10 महिन्यांतच दोनदा प्रेग्नंट, 3 बाळांना जन्म; प्रेग्नन्सीमुळे डॉक्टरही चक्रावले या डिंपल्सबाबत अनेक गैरसमजही (Myths about dimples) आहेत. काही जण त्याचा संबंध सेक्स लाइफशी (Sex Life) जोडतात, तर काही जण असे डिंपल्स असणाऱ्या स्त्रिया भाग्यवान असल्याचं मानतात. खरं तर केवळ शरीररचनेमुळे असे खड्डे अर्थात डिंपल्स तयार होतात. आपल्या पाठीचा कणा आणि त्वचा जोडणाऱ्या लिगामेंटमुळे (Ligament) पाठीवर खालच्या बाजूला नितंबाच्या वर हे डिंपल्स निर्माण होतात. याच्याशी आनुवंशिकता, रक्ताभिसरण याचा कसलाही संबंध नसतो. या नैसर्गिकरित्या तयार होत असल्यानं त्या कृत्रिमरीत्या घडवणं किंवा घालवणंही शक्य नसतं. व्यायामाने (Exercise) त्या निर्माण करता येत नाहीत की घालवताही येत नाहीत. हा कोणताही आजार नाही. त्यामुळं वैद्यकीय परिभाषेतही (Medical Language) याला कोणतंही औपचारिक नाव नाही. OMG! एका झाडाला लागतात 40 वेगवेगळी फळं; एका फांदीची किंमत वाचूनच बसेल धक्का रोमनमध्ये व्हीनस (Venus) ही सौंदर्याची देवी (Goddess of Beauty) मानली जाते. तिच्या नावावरून, स्त्रियांच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या डिंपल्सना डिंपल ऑफ व्हीनस असं नाव पडलं आहे. स्त्रियांच्या शरीरावर सहज न दिसणारे हे डिंपल्स आता स्त्री सौंदर्याचा एक मापदंड म्हणून लोकप्रिय होत असून, आजकालच्या स्त्रिया अगदी अभिमानानं ते मिरवत आहेत. त्यासाठी तिथं पिअर्सिंगही करून घेतलं जात आहे. आजच्या तरुणाईत डिंपल ऑफ व्हीनस मिरवण्याची फॅशन हळूहळू चांगलीच रुजू लागली आहे.
First published:

Tags: Beauty tips, Woman

पुढील बातम्या