तोंड गोड करा आणि कोरोनाशी लढा; सरकार बाजारात आणणार खास मिठाई

तोंड गोड करा आणि कोरोनाशी लढा; सरकार बाजारात आणणार खास मिठाई

रोगप्रतिकारक शक्ती (Immunity booster) वाढवणारी संदेश मिठाई (sandesh sweet) बाजारात आणली जाणार आहे.

  • Share this:

कोलकाता, 29 जून : कोरोना रुग्णांवर (coronavirus patient) उपचार करताना इतर आजारांवरील औषधं दिली जात आहेत. मात्र कोरोनाशी दोनहात करण्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे ती रोगप्रतिकारक शक्ती (immunity). त्यामुळेच आता कोरोनाशी लढण्यासाठी पश्चिम बंगाल सरकार (West Bengal Government) बाजारात एक विशेष मिठाई आणण्याच्या तयारीत आहे.

रसगुल्ल्याप्रमाणेच प्रसिद्ध असलेली संदेश (Sandesh) ही बंगाली मिठाई (Bengali Sweets) आहे. ही मिठाई तयार करण्यासाठी आता अशा सामग्रीचा वापर केला जाणार आहे, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल

पशुधन संसाधन विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, गायीच्या दुधापासून तयार केलेल्या पनीरमध्ये सुंदरबन मध आणि तुळशीचा अर्क मिसळून आरोग्य संदेश तयार केलं जाणार आहे. यामध्ये कोणताही कृत्रिम स्वाद मिसळला जाणार नाही.

कोरोनाव्हायरसवर उपचारासाठी नाही मात्र रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ही मिठाई आहे, असंही या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे.

हे वाचा - कोरोनाची 3 नवी लक्षणं आली समोर, त्रास जाणवला तर तात्काळ करा COVID-19 टेस्ट

सुंदरबनचे मंत्री मांतुराम पखीरा यांनी सांगितलं, आरोग्य संदेश तयार करण्यासाठी पीरखली, झारखली आणि सुंदरबनमधील इतर ठिकाणाहून मध जमवलं जाईल.

आरोग्य संदेश कोलकाता आणि इतर जिल्ह्यांमध्ये या मिठाईची विक्री केली जाईल. पुढील दोन महिन्यांत ही मिठाई बाजारात येणार आहे आणि सामान्य नागरिकांना परवडेल अशाच किंमतीत ही मिठाई उपलब्ध होईल, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

हे वाचा - VIDEO: लॉकडाऊनमध्ये अभिनेत्याचा फिटनेस फंडा; जीम नाही तर अशी करतोय एक्सरसाइज

दरम्यान याआधी कोलकात्यातीलच एका मिठाई विक्रेत्याने अशी संदेश मिठाई तयार करण्यात केली होती. ज्यामध्ये अकरा वनऔषधींचा वापर करण्यात आला होता. ही मिठाई पनीर, ड्रायफ्रुट्स आणि साखरेसह तयार केली जाते. मात्र रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या मिठाईत तुळस, हळद, छोटी वेलची, जायफळ, आलं, काळी मिरी, जिरं, तमालपत्र असे अकरा हर्ब्स वापरण्यात आले. शिवाय यात साखर किंवा गूळ वापरलेला नाही. तर मधाचा वापर करण्यात आला आहे. जेणेकरून मिठाईत वापरलेल्या हर्ब्समधीलपोषक घटक कायम राहतील.

संपादन - प्रिया लाड

First published: June 29, 2020, 5:03 PM IST

ताज्या बातम्या