दीर्घायुषी व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. दीर्घायुष्याचं रहस्य कळलं तर त्याला किती आनंद होईल! अगदी सोप्या पद्धतींचा अवलंब करून तुम्ही जास्त काळ जगू शकता, असा दावा वैज्ञानिकांनी एका संशोधनाच्या आधारे केला आहे. अलीकडे, मानव, उंदीर आणि मासे यांच्या आनुवंशिक विश्लेषणानंतर, त्यांच्या डीएनएमधल्या जीन्सच्या लांबीचा थेट संबंध त्यांच्या जैविक वयोमर्यादेशी असल्याचं शास्त्रज्ञांना आढळून आलं आहे. याचाच अर्थ ज्या सजीवांमधल्या जनुकाची लांबी कमी असेल, त्या सजीवांचं आयुर्मान कमी असेल. जी व्यक्ती जीवनात जास्त द्रव पदार्थांचं सेवन करेल, ती व्यक्ती इतरांपेक्षा जास्त आयुष्य जगेल, असा दावा आता एका नव्या संशोधनात करण्यात आला आहे. याचा अर्थ पाणी, ज्यूस किंवा इतर प्रकारची पेयं पिऊन शरीर नेहमी हायड्रेटेड ठेवणं हेच दीर्घायुष्याचं रहस्य होय. सोडियम पातळीचा प्रभाव ग्लोबल डायबेटीस कम्युनिटीच्या वेबसाइटवर या संदर्भातल्या एका अभ्यासाचा हवाला देण्यात आला आहे. नॅशनल हार्ट, लंग्ज अँड ब्लड इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी हे संशोधन केलं आहे. संशोधनादरम्यान संशोधकांनी गेल्या 30 वर्षांच्या कालावधीत 11,250 जणांच्या सीरम सोडियम लेव्हलची चाचणी केली. ज्या व्यक्तींमध्ये सामान्य सीरम सोडियम पातळी जास्त होती, त्यांचं आयुष्य कमी होतं. ज्या व्यक्तींमध्ये सामान्य सीरम सोडियम पातळी मध्यम होती त्यांचं आयुर्मान जास्त होतं, असं या संशोधनात आढळून आले. 142पेक्षा जास्त सीरम सोडियम लेव्हल असलेल्या व्यक्तींना क्रॉनिक अर्थात गंभीर आजार, स्मृतिभ्रंश, हार्ट फेल्युअर, एट्रियल फायब्रिलेशन, स्ट्रोक आणि डायबेटीस टाइप-2 चा धोका जास्त असतो, असं संशोधनात आढळून आलं. हेही वाचा - सैनिकाच्या छातीत हृदयाजवळच अडकला जिवंत बॉम्ब; सर्जरी करून डॉक्टर काढायला गेले आणि… आजारांशी आहे संबंध संशोधनाच्या प्रमुख लेखिका डॉ. नतालिया दिमित्रएव्हा यांनी सांगितलं, की योग्य प्रकारे शरीर हायड्रेटेड ठेवल्यास म्हणजेच शरीरातली पाण्याची पातळी राखल्यास वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते, असं संशोधनाच्या निष्कर्षातून दिसतं. एवढंच नाही, तर शरीरात द्रव पदार्थांची पातळी स्थिर राहिल्यास आजारांचा धोकाही खूप कमी होतो. तथापि, ज्या व्यक्तीच्या सीरम सोडियमची पातळी 142पेक्षा जास्त आहे ती आहारात द्रव पदार्थांचं प्रमाण वाढवून याचा फायदा घेऊ शकते. सामान्य सीरम सोडियम लेव्हल उच्च असलेल्या व्यक्तीला कमी सोडियम पातळी असलेल्या व्यक्तीच्या तुलनेत हार्ट फेल्युअरचा धोका जास्त असतो, असं याआधीच्या संशोधनात दिसून आलं आहे. नॅशनल अकादमी ऑफ मेडिसीनच्या माहितीनुसार, महिलांनी रोज 1.5 ते 2.2 लिटर पाणी प्यावं, तर पुरुषांनी 2 ते 3 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.