मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Weight Loss Tips : तिशीतही वजन कमी करणे होईल सोपे, फक्त फॉलो करा या सिम्पल टिप्स

Weight Loss Tips : तिशीतही वजन कमी करणे होईल सोपे, फक्त फॉलो करा या सिम्पल टिप्स

काही लोकांना वाटते की ते तिशीनंतर वजन कमी करू शकता नाही. किंवा त्यांना ते खूप अवघड जाईल. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यांच्या आधारे तुम्ही तिशीत किंवा तिशीनंतरही उत्तम प्रकारे वजन कमी करू शकता.

काही लोकांना वाटते की ते तिशीनंतर वजन कमी करू शकता नाही. किंवा त्यांना ते खूप अवघड जाईल. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यांच्या आधारे तुम्ही तिशीत किंवा तिशीनंतरही उत्तम प्रकारे वजन कमी करू शकता.

काही लोकांना वाटते की ते तिशीनंतर वजन कमी करू शकता नाही. किंवा त्यांना ते खूप अवघड जाईल. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यांच्या आधारे तुम्ही तिशीत किंवा तिशीनंतरही उत्तम प्रकारे वजन कमी करू शकता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 ऑगस्ट : आजकाल लोकांना स्वतःची काळजी घेण्यासाठी क्वचितच वेळ मिळतो. जंक फूड, शारीरिक हालचालींचा आणि व्यायामाचा अभाव, ऑफिसमध्ये डेस्कवर तासनतास बसणे यामुळे लोकांना लवकरच लठ्ठपणा आणि इतर अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. वजन कमी करण्याचाही लोक हल्ली खूप प्रयत्न करता.

बरेच लोक आपल्या आरोग्याविषयी खूप जागरूक असतात. मात्र काही लोकांना वाटते की ते तिशीनंतर वजन कमी करू शकता नाही. किंवा त्यांना ते खूप अवघड जाईल. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यांच्या आधारे तुम्ही तिशीत किंवा तिशीनंतरही उत्तम प्रकारे वजन कमी करू शकता. जाणून घेऊया त्या माहिती.

वजन कमी करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

नाश्ता अजिबात स्किप करू नका

रोजच्या जेवणातील सर्वात महत्वाचा भाग हा नाश्ता म्हणजेच ब्रेकफास्ट असतो. त्यामुळे नाश्ता बंद करण्याची किंवा चुकवण्याचा चूक करू नका. सकाळी नाश्ता न केल्यास आपल्या शरीराला हवी तितकी ऊर्जा मिळत नाहीत. त्याउलट नाश्त्यात पौष्टिक आणि फायबर असलेले पदार्थ खा. जेणेकरून पोट भरलेले राहील आणि तुम्ही बाहेरचे खाणे टाळाल.

संतुलित जेवण घ्या

जेवणात संतुलित आहार घेणे वजन कमी करण्यासाठी खूप आवश्यक असते. तुमच्या आहारामध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन, फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स असायला हवे. नेहमी ताजे आणि घरी बनवलेले अन्न घेण्याचा प्रयत्न करा.

भरपूर पाणी प्या

रोज तुम्ही भरपूर प्रमाणात पाणी प्यायला हवे. पाणी आपल्यास शरीरासाठी तर गरजेचे असतेच सोबतच ते वजन कमी करण्यासाठी मदत करते. पाणी प्यायल्याने आपले पॉट भरलेले राहते आणि आपण अतिरिक्त खाणे टाळतो. याने आपसूकच आपले वजन नियंत्रणात राहाते.

बाहेरचे खाणे टाळा

बाहेरचे, तळलेले पदार्थ, जंक फूड फास्ट फूड खाणे जाणीवपूर्वक टाळा. कारण यामुळे तुमचे वजन वेगाने वाढते. त्याऐवजी घरातील काही हेल्दी स्नॅक्स खाण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला पोषण मिळेल आणि तुमचे वजन नियंत्रणात राहील.

मद्यपान टाळा

तुम्हाला जर तुमचे वजन कमी करायचे असेल किंवा नियंत्रित ठेवायचे असेल तर तुम्हाला मद्यपानापासून दूर राहावे लागेल. कारण अल्कोहोलमुळे तुमच्या शरीरात गॅसेस तयार होतात आणि हे तुमच्या शरीरातील फॅट बर्न होण्यापासून रोखते. त्यामुळे तुमचे वजन वाढत जाते.

व्यायाम करा

पौष्टिक आहारासोबतच शरोराला हालचालींची म्हणजेच योग्य व्यायामाचीही खूप गरज असते. व्यायाम केल्याने आपल्या शरीरातील सर्व अवयव व्यवस्थित काम करतात. आणि वजन वाढीसारख्या समस्या उद्भवत नाहीत. त्यामुळे हेल्दी आणि फिट राहण्यासाठी नियमित व्यायाम करणे खूप गरजेचे आहे.

First published:

Tags: Digital prime time, Health Tips, Lifestyle, Weight loss tips