मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

पॉटी होईना म्हणून डॉक्टरांकडे नेलं; एक्स-रेमधून बायकोसमोर आलं नवऱ्याचं लज्जास्पद कृत्य

पॉटी होईना म्हणून डॉक्टरांकडे नेलं; एक्स-रेमधून बायकोसमोर आलं नवऱ्याचं लज्जास्पद कृत्य

नवऱ्याच्या एक्स-रे रिपोर्टमधून बायकोसमोर आलं भलतंच सत्य.

नवऱ्याच्या एक्स-रे रिपोर्टमधून बायकोसमोर आलं भलतंच सत्य.

नवऱ्याच्या बद्धकोष्ठतेचं खरं कारण समजताच बायकोला लाज वाटली.

  • Published by:  Priya Lad
तेहरान, 17 ऑगस्ट :  50 वर्षांच्या एका व्यक्तीच्या पोटात बऱ्याच दिवसांपासून दुखत होतं. त्याला झोपही लागत नव्हती आणि शौचालाही होत नव्हती. कदाचित त्याला बद्धकोष्ठता झाली असावी म्हणून असं त्याच्या पत्नीला वाटलं. तिने घरगुती उपाय करून पाहिले पण काहीच फरक पडत नव्हता अखेर ती त्याला रुग्णालयात घेऊन केली. तिथं त्याच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आला. नवऱ्याचा एक्स-रे रिपोर्ट पाहून तर बायको हादरलीच. नवऱ्याचं लज्जास्पद कृत्य तिच्यासमोर आलं. इराणमधील ही घटना. जेव्हा या व्यक्तीच्या पोटातील वेदना तीव्र झाल्या तेव्हा त्याची बायको त्याला रुग्णालयात घेऊन गेली. सुरुवातीला ही व्यक्ती तो डॉक्टरांकडे जायला नकारच देत होती कारण याचं नेमकं कारण त्याला माहिती होतं जे ते आपल्या बायकोलाही सांगितलं नव्हतं. बायकोशी तो खोटं बोलला होता. अखेर त्याचं सत्य समोर आलंच. हे वाचा - 9 बायका फजिती ऐका! मजेमजेत एकाच वेळी केलं 9 जणींशी लग्न; आता झाला भलताच वांदा ज्याला त्याने आपल्या बायकोला बद्धकोष्ठता असल्याचं सांगितलं आणि त्याची बायकोही तेच समजत होतं, खरंतर ते त्याने केलेल्या भलत्याच कृत्याचा परिणाम होता. एक्स-रेमधून त्याचा हा प्रताप समोर आला. बद्धकोष्ठताऐवजी त्याच्या त्रासाचं भलतंच कारण समोर आलं. त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बाटली अडकली होती. या व्यक्तीने लैंगिक आनंदासाठी ही बाटली प्रायव्हेट पार्टमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी अचानक ही बाटली शरीरात केली. त्याने ती काढण्याचा प्रयत्न केला पण ती काही निघाली नाही. ही बाटली शौचाच्या मार्गातच अडकली होती. त्यामुळे त्याला शौचाला होत नव्हतं आणि पोटात वेदना सुरू झाल्या. डॉक्टरांनी तात्काळ त्याची सर्जरी केली आणि बाटली बाहेर काढली. हे वाचा - 6000 फूट उंच डोंगराच्या कडेवरून झुलत होत्या; अचानक झोपाळा तुटला आणि... काळजाचा ठोका चुकवणारा Shocking video नवऱ्याच्या पोटदुखीचं आणि शौचाला न होण्याचं हे कारण समजताच त्याच्या बायकोलाही लाज वाटली आणि बायको, डॉक्टरांसमोर याचा खुलासा झाल्याने नवऱ्यालाही लाज वाटू लागली. लाजेमुळेच त्याने याआधी हे कुणाला सांगितलं नव्हतं. पण त्याचा त्रासही त्याला झाला.
First published:

Tags: Health, Lifestyle

पुढील बातम्या