नुपूर पाटील, प्रतिनिधी
मुंबई, 27 मार्च : आपलं घर चांगलं दिसावं यासाठी अनेक प्रकारच्या वस्तू आपण वापरतो. त्याचबरोबर काही वस्तू घरामध्ये ठेवल्या तर समृद्धी येते अशीही अनेकांची समजूत आहे. या लकी वस्तूंमध्ये फेंगशुई वस्तूंचाही समावेश असल्याचं मानलं जातं. काही फेंगशुई स्टोन ही आरोग्याला चांगली असतात तर काही करिअरला सपोर्ट करतात, असं म्हंटलं जातं. फेंगशुई स्टोन खरेदी करण्यासाठी मुंबईतील एका ठिकाणाची आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.
मुंबईतील चर्नी रोड भागात क्रिस्टल स्टोन हे दुकान आहे. या दुकानात फेंगशुईचे खास स्टोन मिळतात. येथील विक्रेते दीप गाला यांनी या स्टोनबाबत माहिती दिली. सीट्रीन एंजल हा स्टोन इथं मिळतो. हा स्टोन परिधान केला तर आत्मविश्वास वाढतो असं मानलं जातं.
गुलाब क्वार्ट्ज : गुलाब क्वार्ट्ज म्हणजे शुद्ध, मऊ, प्रेमळ आणि सौम्य ऊर्जा. वेदना, निराशा आणि इतर नकारात्मक ऊर्जा हा स्टोन दूर करतो. बेडरूममध्ये ठेवण्यासाठी हा सर्वोत्तम स्टोन आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय्य तृतीयेला का आहे विशेष महत्त्व?
एमेथिस्ट : खोल जांभळ्या रंगाचा रंग स्टोन आहे. वेगवेगळ्या प्रकारातील हे स्टोन इथं उपलब्ध आहेत. क्रिस्टलचा रंग जितका जास्त खोल असेल तितका दगड अधिक शक्तिशाली समजला जातो. त्यामुळे त्याची किंमतही जास्त आहे.
वाघाचा डोळा : हा फेंगशुईमध्येमधील लोकप्रिय स्टोन आहे. या दगडाची ऊर्जा अद्भुत आहे, असं मानलं जातं.
पायराइट : मुर्खाचे सोने असं याला म्हंटलं जात असलं तर फेंगशुईमधील हा लोकप्रिय स्टोन आहे. घर किंवा ऑफिसमध्ये हा ठेवला जातो, अशी माहिती गाला यांनी दिली. तुम्ही घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये हे स्टोन ठेऊ शकता. त्याचबरोबर दागिने म्हणूनही अंगावर घालू शकता. आमच्याकडं सर्व प्रकारचे स्टोन मिळतात. ब्रेसलेट्स, होम डेकोरेशनसाठी आवश्यक स्टोन, मूर्ती इथं उपलब्ध आहेत. प्रत्येकाचे फायदे वेगळे आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
घरात नक्की ठेवा फेंगशुईच्या या वस्तू, धनसंपत्ती आणि सौभाग्याची होईल सुरुवात
काय आहे किंमत?
या स्टोनची किंमत त्याच्या शुद्धतेनुसार ठरते. क्रिस्टल डिव्हाईन स्टोरमध्ये 500 ते 60000 रुपयांपर्यंत फेंगशुई स्टोन उपलब्ध आहेत.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.