मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /आवरा! 7 फूट 4 इंच उंच मुलीचा बास्केटबॉल कार्टवर धुमाकूळ; विरोधी संघ कसा झटक्यात गारद केला पाहा Video

आवरा! 7 फूट 4 इंच उंच मुलीचा बास्केटबॉल कार्टवर धुमाकूळ; विरोधी संघ कसा झटक्यात गारद केला पाहा Video

या सामन्यात जहांग जियुसमोर विरोधी संघ पूर्णपणे गारद झाला.

या सामन्यात जहांग जियुसमोर विरोधी संघ पूर्णपणे गारद झाला.

चीनच्या (China) शेडोंग प्रांतातील बास्केटबॉल सामन्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये,14 वर्षांच्या जहांग जियु (Zhang Ziyu) नावाच्या खेळाडूने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

दिल्ली,17 जुलै : बास्केटबॉल (Basketball Match) सारख्या खेळात उंची खुप महत्त्वाची असते.संघात उंच खेळाडू असतील तर, त्या संघाची जिंकण्याची शक्यता जास्त असते. उंच खेळाडूंचा एखाद्या संघाला जास्तच फायदा होतो हे दाखवून दिलंय चीनच्या 14 वर्षीय जहांग जियुने (Zhang Ziyu). सोशल मीडियावर सध्या तिचा व्हीडिओ व्हायरल (Social Media Video) होत आहेत. तिची उंची पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. जहांग जियु ही 14 वर्षांची मुलगी 7 फूट 4 इंच उंचीची आहे. जेव्हा ती कोर्टावर उतरते तेव्हा विरोधकांना घामच फूटतो.

पूर्व चीनच्या शेडोंग प्रांतात (Shandong Province) राहणारी जहांग जियु उंचीमुळे व्हायरल होत आहे. अलीकडेच चीनमध्ये झालेल्या 15 वर्षांखालील वयोगटातील  नॅश्नल बास्केटबॉल मॅच (U15 National Basketball Match) लीगमधील तिच्या कामगिरीने लोकांचं लक्ष वेधून घेतलंय. तिने आपल्या उंचीच्या जोरावर एकामागून एक बास्केट केले आणि आपल्या संघाला सहज विजय मिळवून दिला. या सामन्यात जहांग जियुसमोर विरोधी संघ पूर्णपणे गारद झाला.

(Naked City : इथं अगदी बँकेतही लोक नग्नच जातात; कपडे घातल्यावर ठोठावला जातो दंड)

तिची उंची पाहुन सगळेच आश्चर्य चकित झालेत. तिची तुलना प्रसिद्ध बास्केटबॉल प्लेयर यो मिंग (Yao Ming) यांच्याशी केली जातीये. यो मिंग यांची उंची 7.6 फूट होती. ग्लोबल टाईम्सनुसार (Global Times)  पहिलीत असताना जहांग जियुची उंची 5.2 फूट होती. सहावीत ती 6.9 फूट एवढी वाढली.

(तुमचा पार्टनर Whatsapp वर कोणाशी तासनतास गप्पा मारतो? शोधा ही ट्रिक वापरून)

त्यामुळेच तिची तुलना यो मिंग यांच्याशी होते आहे ते जगातले सर्वोत्तम बास्केटबॉल प्लेयर होते. त्यांना 2016 मध्ये हॉल ऑफ फ्रेमने सन्मानीत करण्यात आलं.

(विचित्र अंत! कोणाचा डोक्यावर कासव पडून, कुणाचा कपड्याच्या ढिगाखाली झाला मृत्यू)

जहांग जियुची आई यु यिंग चीनच्या नॅश्नल महिला बास्केटबॉल टिममध्ये होती. तर, वडील प्रोफेश्नल प्लेयर आहेत. तिचा व्हीडिओ व्हायरल झाल्यावर तिच्याकडे भविष्यातली बास्केटबॉल प्लेयर म्हणून पाहिलं जातंय.

First published:

Tags: China, Sports