मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /दर्श वेळा अमावस्या स्पेशल भज्जी पौष्टिक रेसीपी; लातूर, मराठवाड्यातील खास भाजी

दर्श वेळा अमावस्या स्पेशल भज्जी पौष्टिक रेसीपी; लातूर, मराठवाड्यातील खास भाजी

वेळा अमावस्या रेसिपी

वेळा अमावस्या रेसिपी

साहित्यामध्ये दिलेल्या भाज्या कुकरमधून काढून त्यात घाला. सगळं चागलं परतून घ्या. नंतर त्यामध्ये अगोदर तेलावर परतून घेतलेली कांदा पात आणि मेथी घाला आणि मिक्स करा.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 डिसेंबर : कर्नाटक लातूर-मराठवाड्यात खास करून ही भज्जी भाजी बनवतात. बेसन घालून बनवलेली ही भाजी दर्श वेळा अमावस्येला शेतात बसून खाण्याची परंपरा आहे. ही भाजी बनवण्यासाठी पातेल्यात तेल घ्यावं, तेल थोडं तापलं की, त्यामध्ये मेथी आणि कांद्याची पात घाला. मिनिटभर ती चांगली परतून घ्या, ती बाजूनला काढून नंतर भांड्यात फोडणीसाठी परत थोडे तेल घालून त्यात मोहरी आणि जिरे घालून चांगले तडतडून द्या. नंतर त्यात आलं-लसूण पेस्ट घाला, अर्धा मिनिट सर्व परतून घ्या. नंतर त्यात कडीपत्ता घाला, नंतर हळद आणि हिंग घालून घ्या. सगळं मिश्रण चांगलं परतून घ्या.

खाली साहित्यामध्ये दिलेल्या भाज्या कुकरमधून काढून त्यात घाला. सगळं चागलं परतून घ्या. नंतर त्यामध्ये अगोदर तेलावर परतून घेतलेली कांदा पात आणि मेथी घाला आणि मिक्स करा. त्यामध्ये एक वांग छोटे तुकडे करून घाला. मिक्स करून नंतर त्यात चिंचेचा कोळ घाला.नंतर झाकण लावून थोडा वेळ ठेवून द्या आणि नंतर भाजी शिजवलेले पाणी घेऊन त्यात पावकप बेसन घालून चांगलं ढवळून घ्या आणि ते भाजीमध्ये घाला. बेसन घातल्याने थोडं पाणी घालावं लागेल ते शिजण्यासाठी नंतर बारीक गॅसवर भाजी शिजवून घ्या.

हे वाचा - योगर्ट आणि दह्यामध्ये नेमका फरक काय? कोणते अधिक फायदेशीर

लागणाऱ्या गोष्टी :

. वाटाणा पाव कप

. तूर पाव कप

. पावट्या पाव कप

. हरभरा पाव कप

. शेंगदाणे पाव कप

. गाजर पाव कप

. वांग 1

.मेथी अर्धा कप

. कांदा पात अर्धा कप

. बेसन पाव कप

. कच्ची चिंच कोल पाव कप

. लसुण 15, 20 पाकळ्या

. आले अर्धा इंच

. हळद पाव चमचा

. लाल मसाला 1 tsp

. कढीपत्ता 10 ,12

.तेल 4 tbsp.

मोहोरी 1 चमचाभर

जिरं अर्धा चमचा

पाणी 2 कप

First published:
top videos

    Tags: Local Food, Recipie