मुंबई 25 नोव्हेंबर : जीवनात सुख-समृद्धी यावी, यश, पैसा मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी प्रत्येक जण कठोर परिश्रम करत असतो. प्रामुख्याने नोकरदार वर्गाला बऱ्याचदा आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. परिश्रम करूनदेखील आर्थिक समस्या कायम राहतात, हातात पैसा टिकत नाही, अशा स्वरुपाचे प्रश्न नोकरदार वर्गाकडून सातत्याने विचारले जातात. या प्रश्नांवर वास्तुशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्यास आर्थिक समस्या दूर होऊ शकतात. आर्थिक प्रश्न सुटण्यासाठी ऑफिसमध्ये काही वस्तू ठेवाव्यात, असा सल्ला वास्तुशास्त्राच्या अभ्यासकांनी दिला आहे. या वस्तू ऑफिसमध्ये ठेवल्यास आर्थिक आव्हानं कमी होतात आणि पुरेसा पैसा मिळू शकतो. तसंच रखडलेली कामंदेखील मार्गी लागू शकतात. आर्थिक समस्या दूर करणाऱ्या या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत, ते जाणून घेऊया. `एनडीटीव्ही`ने या विषयीची माहिती दिली आहे. नोकरदार वर्गाला भेडसावणाऱ्या आर्थिक समस्या वास्तुशास्त्रातील काही उपायांमुळे दूर होऊ शकतात. यासाठी ऑफिसमध्ये काही वस्तू ठेवणं गरजेचं आहे. वास्तुशास्त्रानुसार कामधेनू गायीची मूर्ती हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. घरासोबत ऑफिसमध्ये ही मूर्ती ठेवणं लाभदायक ठरतं. ऑफिसमध्ये कामाच्या टेबलावर ही मूर्ती तुम्ही ठेऊ शकता. गाय आणि वासराची ही मूर्ती ठेवल्याने आर्थिक समस्या दूर होतात. तसंच कामातील अडथळे दूर होतात. गायीमध्ये सर्व देव-देवतांचा वास असतो, असं हिंदू धर्मात मानलं जातं. हेही वाचा - स्वप्नात सूर्य, चंद्र आणि इंद्रध्वज दिसणं आहे शुभ; पाहा काय सांगते भविष्य पुराण फेंगशुईनुसार लाफिंग बुद्ध अर्थात हसणाऱ्या बुद्धाची मूर्ती समृद्धीकारक मानली गेली आहे. त्यामुळे ही मूर्ती घर आणि ऑफिसमध्ये ठेवणं शुभ मानलं जातं. नोकरदार आर्थिक समस्या दूर व्हाव्यात या उद्देशाने लाफिंग बुद्धाची मूर्ती आपल्या ऑफिसमध्ये ठेवू शकतात. वास्तुशास्त्रात ‘क्रिस्टल ट्री’ शुभ मानलं जातं. हे ट्री घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवल्यास शुभ फलप्राप्ती होते. ऑफिसमध्ये क्रिस्टल ट्री ठेवल्यास रखडलेली कार्यालयीन कामं पूर्ण होतात. आपल्या राशीनुसार क्रिस्टल ट्री तयार करून घेऊन ते ऑफिसमध्ये ठेवल्यास फायदेशीर ठरतं.
फेंगशुई आणि वास्तुशास्त्रात बांबूचं रोप समृद्धीचं प्रतीक मानलं गेलं आहे. हे झाड घरात ठेवल्यास समृद्धी येते आणि सुखकारक साधनांमध्ये वाढ होते. त्यामुळे नोकरदारवर्गाने आपल्या ऑफिसमध्ये एक बांबूचं रोप ठेवावं. यामुळे नोकरीशी संबंधित आणि आर्थिक समस्या दूर होऊ शकतात आणि प्रगतीचे मार्ग खुले होतात.