आयुर्वेदात वात, पित्त आणि कफ हे तीन दोष मुलभूत मानले जातात. हो दोष सामान्यत: माणसाच्या शरीरात असतात. त्यावरून त्या माणसाची आरोग्य प्रकृती निश्चित होते. याला आयुर्वेदाच्या परिभाषेत त्रिदोष असं संबोधलं जातं. 23 ऑक्टोबर रोजी आयुर्वेद दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने ही मूळ संकल्पना विशेष चर्चेत आली आहे. या आपल्या शरीरातील ऊर्जा असून त्या नैसर्गिक घटकांशी जोडलेल्या आहेत. उदाहरणार्थ वाताचा संबंध वायू तत्त्वाशी, कफाचा संबंध जल तत्त्वाशी आणि पित्ताचा संबंध अग्नितत्त्वाशी जोडला गेला आहे. कर्मा आयुर्वेदाचे संस्थापक, डॉ. पुनीत यांनी या त्रिदोषांच्या किंवा आपल्या जीवनातल्या शक्तींचं महत्त्व या विषयी माहिती दिली आहे. आयुर्वेदाच्या जुन्या पद्धतीमध्ये, एक अभ्यासक भावनिक, मानसिक, वर्तणूक किंवा शारीरिक वैशिष्ट्यांच्या आधारे या दोषांची व्याख्या कशी करायची हे शिकतो.इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, डॉ. पुनीत म्हणाले, ``वातामध्ये प्रामुख्याने निसर्गाचे दोन घटक असतात. यात हवा आणि आकारमान यांचा समावेश असतो. हलका, थंड, वाहता, खडबडीत आणि प्रशस्त असं त्याचं वर्णन केलं जातं. सामान्यतः वातदोष असलेल्या व्यक्ती शरीराने सडपातळ, उत्साही आणि सर्जनशील असतात. या व्यक्ती सहजपणे विचलित होतात. त्यांचा मूड हवामान, त्यांच्या सभोवतालचे लोक आणि ते जे अन्न खातात यावर अवलंबून असतो. ` हेही वाचा - किडनीच्या समस्या आहे ‘सायलेंट किलर’, ‘ही’ लक्षणं दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्याच! वात श्वासोच्छवासाचा प्रवाह, स्नायू आकुंचन, हृदयाची गती, ऊतींच्या हालचाली, संपूर्ण मन आणि मज्जासंस्थेतील संप्रेषण यांसारख्या हालचालींचे नियमन वात करतो. वाताच्या असंतुलनामुळे त्वचेच्या समस्या, खोकला, बद्धकोष्ठता, पाठदुखी, महिलांना मासिक पाळीच्या समस्या आणि पोटदुखी यासारखे शारीरिक विकार होऊ शकतात. कफ कफ हा जल आणि पृथ्वी तत्त्वाशी संबंधित आहे. ही एक स्थिर, संयमी, थंड आणि जड ऊर्जा आहे. यामुळे शरीराला चैतन्य, जोम आणि प्रतिकारशक्ती मिळते. हा दोष छातीच्या भागात राहतो, असं मानलं जातं. प्रबळ कफ दोष असलेले लोक सहसा विश्वासू, शांत, सहानुभूतीशील, काळजी घेणारे आणि सहनशील असतात. तथापि, त्यांचं वजन वाढवण्याची शक्यता असते. त्यांना श्वसनासंबंधी समस्या असू शकते तसंच हृदयविकाराचा धोका जास्त असतो. यासाठी त्यांना नियमित मोटिव्हेशन गरजेचं असतं. हेही वाचा - विविध रोगांवर रामबाण औषध आहे तुळस, जाणून घ्या फायदे पित्त पित्त आग आणि उष्णता दर्शवते. तीक्ष्ण, गरम, तेलकट, द्रव आणि हलकी ऊर्जा असं त्याचं वर्णन केलं जातं. सामान्यतः पित्त दोष असलेल्या व्यक्ती पिळदार स्नायू असलेले, क्रीडापटू आणि उत्तम नेतृत्व गुण असलेले असतात. असे लोक अत्यंत प्रवृत्त, स्पर्धात्मक आणि ध्येयाभिमुख वृत्तीचे असतात. हे लोक संघर्षात गुंतलेले असतात. त्यांना पुरळ आणि जळजळीचा त्रास होतो. त्यांचे सातत्याने मूड बदलत असतात. प्रत्येक माणसाच्या प्रकृतीत या तिन्ही दोषांचे कॉम्बिनेशन असतं. तसंच यापैकी एक दोष हा अन्य दोन दोषांच्या तुलनेत अधिक प्रबळ असतो. ज्या संयोगाने व्यक्तीला जन्माला आला आहे, त्याचा परिणाम आयुष्यभर त्याच्या शारीरिक आणि मानसिक वैशिष्ट्यांवर होतो. त्यामुळे एखादी व्यक्ती कफ प्रकृतीची, वात प्रकृतीची किंवा पित्त प्रकृतीची आहे अशी परीक्षा आयुर्वेदतज्ज्ञ प्रथम करतात आणि मग त्यानुसार त्या व्यक्तीवर उपचार करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.