Home /News /lifestyle /

स्वयंपाक कोण करणार? सासू-सुनेचं झालं जोरदार भांडण; सोडवता सोडवता पोलिसांचीही दमछाक

स्वयंपाक कोण करणार? सासू-सुनेचं झालं जोरदार भांडण; सोडवता सोडवता पोलिसांचीही दमछाक

सासू-सुनांमध्ये (Mother in law and Daughte in law) भांडण सोडवण्यासाठी थेट पोलिसांनाच घरी यावं लागलं.

    लखनऊ, 18 मार्च : सासू-सुनेचं भांडण (Mother in law and Daughte in law fighting) तसं काही नवं नाही. असं घर क्वचितच असेल जिथं सासू-सून अगदी मायलेकीप्रमाणे प्रेमानं राहत असतील. अगदी छोट्या छोट्या कारणांवरूनही त्यांच्यात खटके ((Mother in law and Daughte in law fight) उडत असतात. उत्तर प्रदेशमधील (Uttar pradesh) असंच एक प्रकरण समोर आलं आहे, जेवणावरून सासू-सुनांमध्ये (Mother in law and Daughte in law) वाद झाला. तो थेट पोलिसांपर्यंत पोहोचला. गोरखपूरच्या मझगवां गावात राहणारे सासू-सून. दोघांचेही नवरे कामानिमित्त बाहेरच असतात. त्यामुळे या दोघीच घरी. मग काय? त्यांच्यात भांडणं व्हायला काही निमित्त नकोच. काय तर, स्वयंपाक कोण बनवणार यावरून दोघीही आपसात भिडल्या. त्यांच्यामध्ये तू-तू, मै-मै झाली. हा वाद इतका वाढला की अखेर पोलिसांनाच घरी बोलवावं लागलं. पोलिसांनी दोघांमधील भांडण शांत करण्याचा प्रयत्न केला. हे वाचा - अरे देवा! अंड्यानं लावली नवरा-बायकोत भांडणं; पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं प्रकरण पोलिसांनी भांडणाचं कारण विचारलं, तेव्हा दोघींनीही एकमेकींविरोधातील तक्रारीचा पाढाच वाचला. सूनेनं सांगितलं, माझी सासू दिवसभर टीव्ही पाहते. मला शिळं अन्न खायला देते. शिळं खाऊन मी आजाराही पडली आहे. तर सासूने आपल्या सुनेचे आरोप फेटाळून लावले. सून खोटं बोलते आहे, ती पूर्ण दिवस मोबाईलवर असते. जेवण बनवण्यातही आपली मदत करत नाही. अशी तक्रार सासूने केली. रिपोर्टनुसार पोलिसांनी सासू-सुनेच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि त्यांची समजूत काढली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतरच हा वाद मिटला. दोघींनीही आपली तक्रार मागे घेतली आणि पुन्हा अशी तक्रार करू नका, असंही पोलिसांनी त्यांना सांगितलं. हे वाचा - नवरीच्या पाठवणीनंतर नवऱ्यावर आली रडण्याची वेळ! पहिल्याच रात्री जेलमध्ये रवानगी दरम्यान जेवणावरून असं भांडण याआधी नवरा-बायकोतही झालं होतं. महाराष्ट्रातील बुलडाण्यातील हे प्रकरणं पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं होतं. दोघांच्याही तक्रारीनुसार, नवऱ्याने बायकोला बुर्जी करून देण्यासाठी तीन अंडी आणून दिली, पण त्याला बुर्जी मिळाली नाही. पत्नीने आपण ती बुर्जी मुलीला खायला दिल्याचं सांगितलं आणि त्यावरून दोघांमध्ये जुंपली. मग पोलिसांनी त्यांना तीन अंडी देत अनोख्या पद्धतीने हे वाद मिटवला.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Relationship, Uttar pardesh

    पुढील बातम्या