मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /नवरीच्या पाठवणीनंतर नवऱ्यावर आली रडण्याची वेळ! पहिल्याच रात्री जेलमध्ये रवानगी

नवरीच्या पाठवणीनंतर नवऱ्यावर आली रडण्याची वेळ! पहिल्याच रात्री जेलमध्ये रवानगी

लग्न करुन पत्नीसह घरी परतत असलेल्या नवऱ्याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे त्याला पहिलीच रात्र पोलीस स्टेशनमधील जेलमध्ये घालवावी लागली.

लग्न करुन पत्नीसह घरी परतत असलेल्या नवऱ्याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे त्याला पहिलीच रात्र पोलीस स्टेशनमधील जेलमध्ये घालवावी लागली.

लग्न करुन पत्नीसह घरी परतत असलेल्या नवऱ्याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे त्याला पहिलीच रात्र पोलीस स्टेशनमधील जेलमध्ये घालवावी लागली.

मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश) 18 मार्च : लग्न करुन पत्नीसह घरी परतत असलेल्या नवऱ्याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे त्याला पहिलीच रात्र पोलीस स्टेशनमधील जेलमध्ये घालवावी लागली. काही तासांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. त्याची पत्नी माहेरच्यांचा निरोप घेताना सर्व नातेवाईकांच्या गळा पडून रडत होती. हा सारा प्रकार घडत असतानाच नवऱ्या मुलाला अटक झाली. पहिल्याच रात्री पोलिसांच्या मिळालेल्या पाहुणचारामुळे पत्नीनंतर पतीवर रडण्याची वेळी आहे.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh)  मुजफ्फरनगर (Muzaffarnagar) मधील हे प्रकरण आहे. मुंबई पोलिसांनी ज्या नवऱ्या मुलाला अटक केली त्याचे नाव आलोक शुक्ला असून तो अनेक दिवसांपासून नोयडामध्ये परिवारासोबत राहत होता. आलोकला ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आलोक पूर्वी भारताबाहेर राहत असे. विदेशातून परतल्यानंतर त्याने नोयडामध्ये ऑनलाईन पासपोर्ट प्रोव्हायडिंग सर्व्हिसचा व्यवसाय सुरु केला. याच काळात त्याच्या विरोधात मुंबईमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. मुंबईतील अनेकांनी त्याच्याविरोधात ऑनलाईन फसवणूक करुन पैसे हडप केल्याची तक्रार केली होती. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलला तो अनेक दिवसांपासून हवा होता.

(हे वाचा-लॉकडाऊनमध्ये गेली नोकरी म्हणून इंजिनिअर बनला तस्कर; भाजी विक्रीआड विकायचा गांजा )

पोलिसांना अलोकची माहिती मिळताच त्यांनी नोएडामध्ये धाव घेतली. त्यावेळी त्यांना तो तिथे सापडला नाही.  तो लग्नासाठी मुजफ्फरनगरला गेल्याची माहिती मुंबई पोलिसांना समजली. मुंबई पोलिसांनी स्थानिक पोलिसांना आलोकवरील गुन्ह्यांची माहिती दिली.

त्यानंतर, स्थानिक पोलिसांनी नवरा-नवरीची वऱ्हाडातील कार अडवली आणि अलोकला अटक करुन पोलिसांच्या जीपमध्ये बसवले. नवरीच्या माहेरच्या मंडळींना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तिला परत घरी नेले आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Mumbai police, Muzzafarnagar, Online fraud, UP, Uttar pradesh, Wife and husband