• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • बापरे! आईसक्रीम, कोल्ड ड्रिंक चाखलं तरी जाऊ शकतो जीव; विचित्र आजारासह जगतेय तरुणी

बापरे! आईसक्रीम, कोल्ड ड्रिंक चाखलं तरी जाऊ शकतो जीव; विचित्र आजारासह जगतेय तरुणी

या तरुणीला थंडीची गंभीर अॅलर्जी (Woman Allergic to cold) आहे.

 • Share this:
  ब्रिटन, 21 सप्टेंबर : आईसस्क्रिम (Ice Cream) किंवा थंड पदार्थ खाल्ल्याने दात, हिरड्या, तोंड सुन्न होत असल्याचं तुम्ही अनुभवलं असेल. पण कधी अशा थंड पदार्थांमुळे अशी अ‍ॅलर्जी (allergic to cold) असेल ज्यामुळे ते खाणंही शक्य नाही असं तुम्ही ऐकलं आहे का? यूकेतील एका तरुणीला थंडीची इतकी अ‍ॅलर्जी आहे  (British Woman Allergic to cold) की ती ना थंड पदार्थ खाऊ शकत ना थंड पेय (Cold Drinks) पिऊ शकतं (Woman can not eat cold stuff). फ्रोजन फूड जर तिने खाल्लं तर तिच्यासाठी जीवघेणं ठरू शकतं. 20 वर्षांच्या जुजानाला (Zuzanna Dmitruk) लहानपणापासूनच थंडीची अ‍ॅलर्जी आहे. वयाच्या दहाव्या वर्षी तिला याची माहिती झाली. जेव्हा ती ग्लोव्ह्ज न घातला घराबाहेर थंडीत गेली तेव्हा तिची बोटं लाल झाली, सुजली आणि त्यांना खाज येऊ लागली. जसजसं वय वाढत गेलं तसतसं तिच्यातील अ‍ॅलर्जीची लक्षणंही वाढू गेली आणि मग सर्वसामान्य आयुष्य जगणं तिला अशक्य झालं. हे वाचा - Havana Syndrome: भारतातही हवाना सिंड्रोम आलाय? अनोख्या लक्षणांमुळं डॉक्टरही चकित डॉक्टरांनी सांगितलं की तिला थंडीची खूप अ‍ॅलर्जी ( cold urticaria) आहे. यामुळे थंडीच्या संपर्कात येताच तिच्या हातापायाची बोटं सूजतात आणि तिच्या त्वचेवर मोठमोठ्या चकत्या येतात. जर तिनं गोठलेले अन्नपदार्थ खालेल तर तिला श्वास घेणंही अशक्य होतं. जुजाना सांगते,  ती थंड ड्रिंक्सबाबत विचारही करू शकत नाही. आता या अॅलर्जीपासून ती जगायला शिकली आहे. ती कोणतंही ड्रिंक पिते तेव्हा त्यात बर्फ टाकत नाही, ते रूम टेम्प्रेचवरवर ठेवते. आइसस्क्रिमसुद्धा ती विरघळवून घाते. स्वतःसाठी ती फ्रोजन फूड बिलकुल खरेदी करत नाही. ती फ्रिजरचा वापर करत नाही. ती जास्तीत जास्त गरम खाणं पसंत करते. हे वाचा - बायसेप्ससाठी शरीरात सोडलं 6 लीटर पेट्रोलिअम जेली; आता जीवासाठी बॉडीबिल्डरची धडपड जुजानाने आपल्या या विचित्र अॅलर्जीचा अनुभव सोशल मीडियावर मांडला आहे. टिकटॉकवर तिने आपला व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिचा हा विचित्र आजार ऐकून लोक हैराण झाले आहेत.  तिचा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. अनेकांनी तिची तुलना फ्रोजन फिल्मच्या एल्साशी केली आहे.
  Published by:Priya Lad
  First published: