जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / ढोलेशोले बनवण्यासाठी घेतलं 6 लीटर पेट्रोलिअम जेलीचं इंजेक्शन; आता जीवासाठी धडपडतोय बॉडीबिल्डर

ढोलेशोले बनवण्यासाठी घेतलं 6 लीटर पेट्रोलिअम जेलीचं इंजेक्शन; आता जीवासाठी धडपडतोय बॉडीबिल्डर

ढोलेशोले बनवण्यासाठी घेतलं 6 लीटर पेट्रोलिअम जेलीचं इंजेक्शन; आता जीवासाठी धडपडतोय बॉडीबिल्डर

बॉडी बनवण्याच्या नादात बॉडीबिल्डरने जीव टाकला धोक्यात.

  • -MIN READ
  • Last Updated :

रोम, 20 सप्टेंबर : जशा तरुणी आपल्या सौंदर्यासाठी धडपडत असतात, तसे तरुण आपल्या बॉडीसाठी (Bodybuilder). आपली हिरो किंवा सुपरहिरोसारखी बॉडी असावी असं बहुतेर तरुणांना वाटतं. यासाठी ते जीममध्ये तर जातातच. पण कमीत कमी एक्सरसाइज आणि कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त बॉडी बनवण्यासाठी वेगळे उपायही करतात. असाच एक उपाय करणं रशियाच्या एका बॉडीबिल्डरला (Russian bodybuilder) चांगलाच महागात पडलं आहे. रशियातील 25 वर्षांचा किरिल टेरिशिनने (Kirill Tereshin) झटपट बॉडी बनवण्यासाठी पेट्रोलिअम जेलीचे इंजेक्शन घेतले (Petroleum Jelly Injection). पण आता त्याचा जीव धोक्यात आहे. त्याला वाचवण्यासाठी आता हात कापावा लागू शकतो. द मिररच्या रिपोर्टनुसार किरिलने सुरुवातीला इंजेक्शनचा काय परिणाम होतो, हे समजून घेण्यासाठी इंजेक्शन घेतलं. त्याचा परिणाम चांगला दिसताच त्याने त्याची मात्रा वाढवली. हळूहळू त्याने आपल्या हातात तब्बल 6 लीटर पेट्रोलिअम जेली इंजेक्ट केलं. त्यानंतर त्याचे बायसेप्स 24 इंचाचे झाले. हे वाचा -  हाय प्रोटीन डाएटने बॉडी बनेल पिळदार; पण आरोग्याचं होऊ शकतं वाटोळं! हे वाचा… थोड्या दिवसांनी त्याला तीव्र ताप आला आणि वेदना सुरू झाल्या. इंजेक्शनने त्याच्या शरीरातील रक्तप्रवाह थांबला होता. ज्यामुळे त्याची प्रकृती बिघडली. डॉक्टरांनी जेव्हा किरिलला पाहिलं तेव्हा त्याचा हात कापण्याची वेळ येऊ शकते, हे त्यांनी स्पष्ट केलं. डॉक्टरांनी त्याच्या हातात पेट्रोलिअम जेलीच्या इंजेक्शनमधून नसांमार्फत पोहोचलेलं सिंथॉल ऑईल आणि डेड मसल्स टिश्यू बाहेर काढले आहेत. तरीपण त्याला आराम मिळालेला नाही.  प्रकरणं खूप आव्हानात्मक आणि अति गंभीर आहे. शरीरात भरपूर कालावधीसाठी विषारी पदार्थ पोहोचणं धोकादायक ठरू शकतं. आता डॉक्टर्स त्याचे नकली बायसेप्स काढण्याच्या तयारीत आहेत. कारण आता त्याच्या जीवावर बेतू शकतं. हे वाचा -  काय म्हणावं याला! स्वतःच्या लग्नातही डायपर घालून उभा राहिला; महिनाभर टॉयलेटला गेलाच नाही किरिललाही आता इंजेक्शनने बॉडी बनवण्याचा प्रयत्न करण्याच्या आपल्या चुकीचा पश्चाताप होतो आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात