ब्रिटन, 05 ऑगस्ट : कधीकधी आपल्यासोबत असं काही घडतं ज्याची कल्पनाही आपण करू शकत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे असं का झालं, तेसुद्धा आपल्याला समजत नाही. ब्रिटनमधील एका तरुणीसोबत असंच काही घडलं. ज्यामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. एका रात्री तरुणीने एका अज्ञात व्यक्तीसोबत असं काही केलं (Girl freezed after drink), की ज्यानंतर ती काही क्षणातच पुतळा बनली आहे (Girl freezed like statue). यूकेच्या (UK) एसेक्समधील ही धक्कादायक घटना आहे (Girl frozen).
18 वर्षांची मिली टॅपलिन. पहिल्यांदाच ती नाइट क्लबमध्ये (Girl freezed in nightclub) गेली होती. पण नाइट क्लबमधील ही पहिली रात्र तिच्यासाठी इतकी भयंकर ठरेल याचा तिने विचारही केला नव्हता. नाइट क्लबमध्ये ती एन्जॉय करण्यासाठी म्हणून गेली पण तिथं तिच्यासोबत असं काही विचित्र घडेल, हे तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं.
हे वाचा - OMG! शरीरावर अशी एकही जागा नाही जिथं गाठ नाही; या महिलेला नेमकं झालंय तरी काय?
मिली नाइट क्लबमध्ये गेली आणि तिथं ती काही क्षणातच फ्रिज झाली. तिचं शरीर आखडलं आणि ती एखाद्या पुतळ्यासारखी झाली. तिच्या शरीराचा कोणताच अवयव हलत नव्हता. चेहरासुद्धा, हाताची बोटं वाकडी झाली होती. डोळे जसेच्या तसे उघडे होते. तिला पाहून सर्वजण हैराण झाले.
मिलीच्या आईने तिचे असे शॉकिंग फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहे. मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार मिलीच्या आईने सांगितल्यालं नाइट क्लबमध्ये मिलीची एका अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री झाली. त्या व्यक्तीने मिलीला ड्रिंक ऑफर केलं. ड्रिंक घेतल्यानंतर मिलीचं शरीर आकडू लागलं. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
हे वाचा - 20 वर्षे बाळासाठी प्रयत्न; पतीने ब्रेड खाणं सोडलं, 5 महिन्यांत बायको प्रेग्नंट
मिली जवळपास 4 तास या अवस्थेत होती. शुद्धीवर आल्यानंतर तिने सांगितलं, मी ड्रिंकचे फक्त दोनच घोट घेतले होते. पूर्ण ग्लासभर ड्रिंक प्यायली नव्हती. त्यानंतर स्मोकिंग एरियामध्ये गेले. तिथून परतल्यानंतर मी जास्तच दारू प्यायले असं मला वाटू लागलं. त्यानंतर माझ्या शरीरावर माझं नियंत्रण राहिलं नाही. माझे हात-पाय आकडू लागले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Lifestyle, Shocking, Shocking news, Viral, Viral news