मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /आता हद्दच झाली! बापालाही हवी स्लिम ट्रिम लेक; मरेपर्यंत फिट राहण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट

आता हद्दच झाली! बापालाही हवी स्लिम ट्रिम लेक; मरेपर्यंत फिट राहण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट

या बापाने आपल्या मुलीकडून कधीच लठ्ठ (obese) न होण्याचं कॉन्ट्रॅक्टही साइन करून घेतलं आहे.

या बापाने आपल्या मुलीकडून कधीच लठ्ठ (obese) न होण्याचं कॉन्ट्रॅक्टही साइन करून घेतलं आहे.

या बापाने आपल्या मुलीकडून कधीच लठ्ठ (obese) न होण्याचं कॉन्ट्रॅक्टही साइन करून घेतलं आहे.

ब्रिटन, 12 मार्च : मला स्लिम ट्रिम, नाजूक गर्लफ्रेंड हवी किंवा बायको हवी अशी अपेक्षा बहुतेक पुरुषांची असते. अशी कित्येक प्रकरणं आहेत ज्यामध्ये लठ्ठ (obesity) म्हणून मुलींना नाकारण्यात आलं आहे. लठ्ठ (obese) म्हणून कुणाच्या बॉयफ्रेंडनं ब्रेकअप केला तर कुणाच्या नवऱ्याने तिला सोडलं. बॉयफ्रेंड झाला, नवरा झाला आता तर चक्क बापालाही स्लिम ट्रिम लेक हवी आहे.

जगातील एका पुरुषाला मुलगी कशीही असली तरी चालते आणि ते म्हणजे वडील. आपली मुलगी सावळी असो, लठ्ठ असो किंवा दिसायला सुंदर नसली तरी ती वडिलांसाठी गोड परीच असते. पण यूकेमधील (UK) एका बापाला मात्र त्याची मुलगी स्लिम ट्रिम हवी आहे आणि यासाठी तर त्याने तिच्याकडून कधीच लठ्ठ न होण्याचं कॉन्ट्रॅक्टही साइन करून घेतलं आहे.

56 वर्षांचे राचिद खादला यांना फिटनेसचं भरपूर वेड.  त्यांनी आपल्या मुलीकडूनही फिटनेसबाबतील करारही करून घेतला आहे. मरेपर्यंत आपली मुलगी लठ्ठ होणार नाही, असा दावा या कॉन्ट्रॅक्टमध्ये करण्यात आलं आहे. आपल्या मुलीकडून त्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट साइन करून घेतलं आहे.

राचिद यांच्यावर आपल्याच मुलांचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी कोर्टात केस सुरू आहे.

हे वाचा - बॉयफ्रेंडने नकार दिल्यावर 136 किलो वजन असलेल्या महिलेनं केलं असं की...

राचिद यांची 23 वर्षांची मुलगी अमिराने कोर्टात सांगितलं, तिथे वडील मुलांना स्वतःच्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतात. कोणते कपडे घालायचे, कुणाला भेटायचं, कुणाशी मैत्री करायची, टीव्हीवर काय पाहायचं हे सर्वकाही तेच ठरवतात. वडीलांच्या या अशा विचित्र निर्बंधांमुळे आपण वैतागलो आहेत. फिटनेसबाबत तर ते खूपच गंभीर आहेत. त्यांनी माझ्याकडून एक करारही करून घेतला आहे.

करारात म्हटलं आहे, मी... अमिरा... कधीच स्वतःला लठ्ठ होऊ देणार नाही. मी खूप एक्सरसाइज करेन जेणेकरून मी लठ्ठ होणार नाही. मी लठ्ठ न होण्याचा प्रयत्न मरेपर्यंत करत राहेन. या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर आपण खूप घाबरल्याचंही अमिरानं सांगितलं.

मी जेव्हा लहान होते तेव्हा ते मला नेहमी चमच्याने मारायचे. हात आणि छातीवर मुक्के मारायचे. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी माझ्यावर खुर्ची फेकली होती, जी माझ्या कानाला लागली आणि कान सूजला होता, असंही अमिरानं सांगितलं.

हे वाचा - त्सुनामीत हरवली बायको; शेवटच्या मेसेजमुळे 10 वर्षे नवऱ्यानं धुंडाळला समुद्र

राचिद यांनी फक्त अमिराच नाही तर आपल्या इतर मुलांचाही छळ केला आहे. अमिराचा लहान भाऊ हिचामने कोर्टात सांगितलं की, लहानपणापासूनच त्याचे वडील त्याला मारहाण करायचे पण एकदा तर त्यांनी गळा दाबण्याचाही प्रयत्न केला. त्याने याबाबत मित्र आणि शिक्षकांनाही सांगितलं होतं. यानंतर त्याच्या वडिलांना पोलिसांना अटक केली होती. राचिदचा सर्वात मोठा मुलगा करीम वडिलांच्या या अशा वागण्याला वैतागून घर सोडून निघून गेला आहे.

First published:

Tags: Father, Fitness, Health, Obesity, Uk, Weight, Weight loss, Wellness