मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कोरोना म्हणजे काय? दोनदा पॉझिटिव्ह झालेल्या तरुणाला महासाथीची माहितीच नाही

कोरोना म्हणजे काय? दोनदा पॉझिटिव्ह झालेल्या तरुणाला महासाथीची माहितीच नाही

अगदी लहान मुलांनाही कोरोना म्हणजे काय हे माहिती झालं आहे. पण हा तरुणाला त्याची लागण होऊनही माहिती नाही असं का वाचा सविस्तर.

ब्रिटन, 03 फेब्रुवारी : गेल्या वर्षभरात जग किती बदललं आहे, हे ज्यांनी ते प्रत्यक्ष अनुभवलंय त्यांच्याही पटकन पचनी पडलेलं नाही. कोरोनापूर्व (Before Corona) आणि कोरोनोत्तर (After Corona) असे दोन भाग झालेत असं म्हणण्यासही हरकत नाही. जगण्याच्या प्रत्येक गोष्टीत काही ना काही छोटे-मोठे बदल झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर, एखादा तरुण मुलगा कोरोनापूर्व काळात कोमात गेला असेल आणि कोरोनोत्तर काळात कोमातून बाहेर आला असेल तर? अशीच एक गोष्ट ब्रिटनमध्ये (Briton) प्रत्यक्ष घडली आहे.

19 वर्षांचा जोसेफ फ्लाविल (Joseph Flowil) नावाचा विद्यार्थी गेले 11 महिने कोमामध्ये होता. स्टॅफर्डशायर (Staffordshire) शहरात त्याला एका कारने जोरदार धडक दिली होती. त्या अपघातात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे जोसेफला लिसेस्टर जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच तो कोमात (Coma) गेला होता. हा अपघात घडला, तेव्हा जगभरात कोरोनाने फारसा धुमाकूळ घातला नव्हता. त्यामुळे जोसेफला त्याबाबत कितपत माहिती होतं, याचा अंदाज नाही. आता त्याने 11 महिन्यांनी डोळे उघडले आहेत, तेव्हा मात्र सगळी परिस्थिती बदलली आहे.

हे वाचा - कोरोना काळात प्रिय व्यक्तीला गमावलं आहे? इथे करता येईल स्मृतींचं जतन

ब्रिटनमध्ये तर कोरोना विषाणूची (Coronavirus) अधिक घातक अशी दुसरी स्ट्रेन (New Strain) सापडल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर आहे. रिपोर्टनुसार जोसेफलाही दोन वेळा कोरोना झाला. पण याबद्दल त्याला काहीही माहिती नाही. जोसेफ शुद्धीवर आला म्हणून त्याचे कुटुंबीय खूप खूश आहेत. पण नुकताच धक्क्यातून सावरत असलेल्या जोसेफला कोरोना महासाथ (Pandemic), लॉकडाउन (Lockdown) वगैरे सगळ्याबद्दल सांगायचं कसं, असा प्रश्न त्याच्या कुटुंबीयांना पडला आहे.

हे वाचा - कोरोना काळात प्रिय व्यक्तीला गमावलं आहे? इथे करता येईल स्मृतींचं जतन

एवढ्या मोठ्या कालावधीत कोमामध्ये असलेला जोसेफ आता हळूहळू लोकांना ओळखू लागला आहे. त्याची तब्येत वेगाने बरी होत आहे; पण कोरोनामुळे निर्बंध लागू असल्यामुळे कुटुंबीय त्याला भेटू शकत नाहीत. जोसेफची काकी सैली फ्लाविल म्हणाल्या, "जोसेफला अद्याप त्याच्या आईलाही भेटता आलेलं नाही.  कोमात जाण्यापूर्वी त्याला कोरोनाबद्दल किती माहिती होती, याची आम्हाला कल्पना नाही; त्यामुळे आता त्याला त्याबद्दल कसं सांगायचं, याबद्दल आम्ही विचार करत आहोत"

First published:

Tags: Corona, Coronavirus, Covid19