नवी दिल्ली, 10 मार्च : आपल्यापैकी बहुतेक असे लोक आहेत जे आयुष्यात कधी ना कधी नैराश्याला बळी पडलेले असतात. वास्तविक हा एक मानसिक आजार आहे, ज्यावर वेळीच उपचार केले नाहीत तर तो काळानुसार वाढत जातो आणि एकवेळ इतकी निराशा आणि उदासीनता येते की, व्यक्तीला समोर फक्त अंधारच दिसतो. या स्थितीमुळे रुग्णाला सामान्य जीवनात परत येणं खूप कठीण होऊ शकतं आणि कधीकधी आत्महत्या करण्याची इच्छाही तीव्र असते. अशा परिस्थितीत आपण ही लक्षणं योग्य वेळी ओळखून त्यावर मात केली पाहिजे, शिवाय इतर लोकांचीही मदत करणं आवश्यक (Types Of Depression, Symptoms and Primary treatment) आहे. मेडटॉक्सच्या मते, या अवस्थेत व्यक्तीचे मन नकारात्मकता, चिंता, तणाव आणि दुःखाने भरून जाते आणि त्याची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता नष्ट होते आणि तो कुठेतरी हरवायला लागतो. जेव्हा एखादी व्यक्ती दीर्घकाळ या अवस्थेत राहते तेव्हा हा आजार भयंकर रूप धारण करू शकतो. WHO काय म्हणणे? डब्ल्यूएचओच्या मते, सध्या जगभरात सुमारे 264 दशलक्ष लोक नैराश्यग्रस्त (Depression) आहेत. एवढेच नाही तर जगात जे काही शारीरिक आणि मानसिक आजार फोफावत आहेत, त्यामागे नैराश्य हे प्रमुख कारण आहे. नैराश्याचे प्रकार 1. प्रमुख नैराश्य आठवड्यातून दर दुसर्या दिवशी तुम्हाला नैराश्य येत असेल तर त्याला मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर असं म्हणतात. अशा स्थितीत, लोकांना दररोज दु:ख वाटते. जर आपण इतर लक्षणांबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये स्वारस्य कमी होणं किंवा दैनंदिन क्रियाकलाप, जलद वजन कमी होणे किंवा झपाट्याने वाढणे, झोपेचा त्रास, अस्वस्थ आणि उत्साही न वाटणं, सतत थकल्यासारखं वाटणं, अपराधीपणाची भावना, आत्महत्येचे विचार मनात येणं. यापैकी काहीही लक्षणं आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा. 2. मेलानकॉलिक डिप्रेशन (Melancholic Depression) तुम्हाला मेलानकॉलिक डिप्रेशन (Melancholic Depression) असल्यास, सकाळी उठल्यानंतर लगेच तुम्हाला मोठ्या नैराश्याची लक्षणे दिसतील. ती आरोग्यासाठी आणखी घातक ठरू शकतात. 3. सतत उदासीनता विकार (Persistent depressive disorder) जर तुम्ही दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ डिप्रेशनमध्ये असाल, तर तुम्ही सतत पर्सिस्टंट डिप्रेशन डिसऑर्डरनेग्रस्त आहात. या विकारामध्ये डिस्टिमिया आणि क्रॉनिक मेजर डिप्रेशन या दोन परिस्थितींचा समावेश होतो. जेव्हा असे होते तेव्हा एकतर भूक लागत नाही किंवा ते आवश्यकतेपेक्षा जास्त खायला लागतात. याशिवाय झोप खूप किंवा खूप कमी होते. अशक्तपणा, स्वत:ला दोषी माननं, कमी एकाग्रता, निराशा इत्यादी लक्षणं जाणवतात. 4. बाइपोलर डिसऑर्डर (Bipolar disorder) बायपोलर डिसऑर्डरमध्ये मूडमध्ये बरेच चढ-उतार असतात. हे तीव्र नैराश्याचे रूप देखील घेऊ शकते. अशा परिस्थितीत औषधोपचार करणं आवश्यक आहे. हे वाचा - Radish Health Benefits: हृदय विकारांसह BP सुद्धा राहील नियंत्रणात; हिवाळ्यात मुळा खाण्याचे इतके आहेत फायदे 5. सीझनल इफेक्टिव्ह डिसऑर्डर (एसएडी) सीझनल इफेक्टिव्ह डिसऑर्डर हिवाळ्याच्या महिन्यांत अनेकदा दिसून येतो. तर उन्हाळ्यात किंवा इतर आल्हाददायक हवामानात आराम मिळतो. या रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर औषधं घेणं उपयुक्त ठरतं आणि थेरपीही उपयुक्त ठरते. 6. सायकोटिक डिप्रेशन (Psychotic Depression) या प्रकारातील लोकांना मानसिक नैराश्यानं घेरलं जातं, जे एखाद्या घटनेमुळे देखील असू शकतं. त्याची लक्षणं विचित्र स्वप्ने, भ्रम होणे, वेडेपणा इ. हे देखील औषधांच्या मदतीने बरे होऊ शकतात. हे वाचा - Travel Tips : तुम्हीही हिल स्टेशनवर जाण्याचा विचार करताय? मग या महत्त्वाच्या गोष्टी बॅगेत असाव्यातच 7. पोस्टपर्टम डिप्रेशन बऱ्याच स्त्रियांना मुलाच्या जन्मानंतर काही महिने नैराश्य येते, जे कधीकधी आई आणि मुलाच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे त्यांना कुटुंबाचा पाठिंबा, काळजी आणि प्रेम. याच्या अभावी महिला नैराश्याच्या बळी ठरतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.