मुंबई, 14 फेब्रुवारी : ब्रेन ट्यूमर हे मेंदूतील पेशींच्या असामान्य वाढीद्वारे दर्शविले जाते. मेंदूच्या किंवा कवटीच्या कोणत्याही भागामध्ये ट्यूमर वाढू शकतात, ज्यात मेंदूच्या खालच्या बाजूस, संरक्षणात्मक अस्तर, मेंदूचा भाग आणि अनुनासिक पोकळी यांचा समावेश होतो. जेव्हा ट्यूमर मेंदूच्या आत वाढतो. तेव्हा तो त्या भागावर दबाव टाकतो आणि ते भाग शरीराच्या ज्या कार्यासाठी जबाबदार असतात. त्यावरही याचा परिणाम होतो. संशोधकांनी 150 पेक्षा जास्त प्रकारचे ब्रेन ट्यूमर ओळखले आहेत. एबीपी माझ्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, ब्रेन ट्यूमर हे जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. अमेरिकन असोसिएशन ऑफ न्यूरोलॉजिकल सर्जनच्या मते, ब्रेन ट्यूमरचे 150 पेक्षा जास्त प्रकार आहेत. हे प्रामुख्याने दोन गटात विभागले जातात, पहिला प्राथमिक आणि दुसरा मेटास्टॅटिक ब्रेन ट्यूमर.
शरीरातील वाढलेले बॅड कोलेस्टेरॉल सहज होईल कमी, फक्त रोज करा ही 4 सोपी योगासनेमेंदूमध्ये सुरू होणाऱ्या आणि वाढणाऱ्या ट्यूमरला प्राथमिक ब्रेन ट्यूमर म्हणतात. हे त्या ट्युमरपासून वेगळे असतात जे शरीराच्या इतर भागांतून मेंदूमध्ये पसरतात. अशा ट्यूमर्सना सेकंडरी ब्रेन ट्यूमरदेखील म्हणतात. काही ब्रेन ट्यूमर कॅन्सर नसलेले म्हणजे नॉन कॅन्सरस असतात. तर काही ट्युमर जीवघेणे देखील ठरू शकतात.
यूके नॅशनल हेल्थ सर्व्हिसेस (एनएचएस) यांच्यानुसार, कर्करोग असलेले ट्यूमर आणि कर्करोग नसलेल्या ब्रेन ट्यूमरची लक्षणे वेगवेगळी असू शकतात. मात्र काही लक्षणं जसे की, डोकेदुखी, चक्कर येणे, सतत आजारी वाटणे, उलट्या होणे, लक्षात ठेवण्यास त्रास होणे, वागण्यात बदल, दृष्टीमध्ये आणि बोलण्यात समस्या अशी काही लक्षणे सर्व प्रकारच्या ब्रेन कॅन्सरमध्ये दिसू शकतात. हा आहे सर्वात जीवघेणा प्रकार ब्रेन ट्यूमरचे 150 हून अधिक प्रकारांपैकी ग्लिओब्लास्टोमास हा प्रौढांमधील सर्वात घातक प्राथमिक कॅन्सर आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. हा ट्युमर मेंदू किंवा पाठीच्या कण्यातील पेशींच्या वाढीसोबत मोठा होत जातो आणि याची वाढ खूप वेगाने होते. हळूहळू ते निरोगी ऊतींवर हल्ला करून त्यांचा नाश करू लागते. ग्लिओब्लास्टोमा एस्ट्रोसाइट्स नावाच्या पेशींपासून तयार होतो. हे मज्जासंस्थेशी संबंधित आहे. विशेष म्हणजे हा कर्करोग कोणत्याही वयात होऊ शकतो. खाल्यानंतर नेहमी पोटातील गॅसची समस्या सतावते? डॉक्टरांकडून जाणून घ्या उपाय