मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Type 4 Diabetes बाबत माहिती आहे का? 'या' लोकांना सर्वात जास्त धोका; अशी दिसतात लक्षणं

Type 4 Diabetes बाबत माहिती आहे का? 'या' लोकांना सर्वात जास्त धोका; अशी दिसतात लक्षणं

मधुमेहावर नियंत्रण

मधुमेहावर नियंत्रण

सर्व प्रकारच्या मधुमेहामुळे शरीरात इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता निर्माण होते आणि रक्तातील साखरेची पातळी वाढते. वेगवेगळ्या प्रकारच्या मधुमेहावर वेगवेगळ्या पद्धतीने उपचार केले जातात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 8 सप्टेंबर : आजच्या युगात मधुमेह ही सर्वात मोठी आरोग्य समस्या बनली आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत या समस्येला सामोरे जावे लागत आहे. मधुमेहाचा शरीराच्या सर्व भागांवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे हृदयविकार, मानसिक समस्यांसह इतरही अनेक समस्या उद्भवतात. मधुमेहाचे अनेक प्रकार आहेत. बहुतेक लोक टाइप 2 आणि टाइप 1 मधुमेहास असुरक्षित असतात. काही लोकांना टाइप 3 आणि टाइप 4 मधुमेहाचा त्रास होतो. तुम्हाला टाइप 4 मधुमेहाबद्दल माहिती आहे का? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणत्या वयोगटातील लोकांना या मधुमेहाचा त्रास होतो आणि त्याचे कारण काय आहे.

टाइप 4 मधुमेह म्हणजे काय?

हेल्थलाइनच्या अहवालानुसार, टाइप 4 मधुमेह हा वृद्ध लोकांमध्ये इन्सुलिन प्रतिरोधकतेमुळे होणारा आजार आहे. हा आजार वृद्ध लोकांमध्ये होतो, ज्यांचे वजन जास्त नसते आणि ते सडपातळ असतात. टाईप 2 मधुमेहामागे लठ्ठपणा हा एक प्रमुख घटक मानला जातो, परंतु टाइप 4 मध्ये तसे नाही. याची नेमकी कारणे शोधण्याचा शास्त्रज्ञ सध्या प्रयत्न करत आहेत. वाढत्या वयामुळेही हा आजार होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. 2015 च्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, टाइप 4 मधुमेह रोगप्रतिकारक पेशींच्या अतिउत्पादनामुळेदेखील होऊ शकतो. हा अभ्यास उंदरांवर करण्यात आला.

Neck Rashes Remedy : बाळाच्या मानेवर वारंवार येतात पुरळ? मग करून पाहा हे 5 घरगुती उपाय

टाइप 4 मधुमेहाची लक्षणे

टाइप 4 मधुमेहाची लक्षणे इतर प्रकारच्या मधुमेहासारखीच असतात. मात्र हे कमी वजन असलेल्या लोकांमध्ये आढळते. म्हणून अंदाज लावणे थोडे कठीण होते. त्याचीही काही लक्षणं आहेत. जी इतर आजारांसारखी दिसतात. त्यामुळे तपासणीनंतरच नेमके निदान कळू शकते. चला त्याच्या काही प्रमुख वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूया.

अत्यंत थकवा येणे

जास्त भूक आणि तहान

धूसर दृष्टी

जखम भरून न येणे, जखम बरी न होणे

वारंवार मूत्रविसर्जन

अचानक वजन कमी होणे

Workout Outfit Idea : हे आहेत वर्कआउटसाठी काही परफेक्ट आउटटफिट्स, मिळेल कूल आणि कम्फर्टेबल लूक

यावर उपचार काय?

टाईप 4 डायबिटीजवर आतापर्यंत कोणताही अचूक उपचार सापडलेला नाही. संशोधकांना आशा आहे की ते अँटीबॉडी औषध विकसित करण्यास सक्षम असतील. हे शरीरातील नियामक टी-सेल्सची संख्या कमी करण्यास आणि टाइप 4 मधुमेहावर उपचार करण्यास मदत करू शकते. जोपर्यंत हे औषध विकसित होत नाही, तोपर्यंत डॉक्टर टाइप 2 मधुमेहावरील औषधांसोबत उपचार करत आहेत.

First published:

Tags: Disease symptoms, Health, Health Tips, Lifestyle, Tips for diabetes