मुंबई, 12 डिसेंबर : चुकीची जीवनशैली, पुरेसा व्यायाम आणि पूरक आहाराचा अभाव, ताण-तणाव आदी कारणांमुळे मधुमेहग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. डायबेटिजमुळे (Diabetes) विविध प्रकारच्या शारीरिक समस्या निर्माण होतात. सर्वसाधारपणे टाईप-2 डायबेटिस (Type-2 Diabetes) असलेल्या रुग्णांमध्ये ब्लॉटिंग (Blotting) म्हणजेच पोट फुगण्याची समस्या दिसून येते Type-2 Diabetes patient stomach problem). पचनासंबंधी समस्या, चुकीच्या आहारामुळे देखील पोटफुगीचा त्रास होऊ शकतो. परंतु, असा त्रास वारंवार होत असल्यास हा प्रकार काही गंभीर आजारांचा सूचक मानला जातो.
तज्ज्ञांच्या मते, ब्लॉटिंग अर्थात पोटफुगी होण्यामागे अनेक कारणं असतात. पचनक्रियेतील अडथळा किंवा चुकीचा आहार यासाठी प्रामुख्यानं कारणीभूत ठरतो. परंतु, संबंधित रुग्णाला जर डायबेटिज असेल आणि पोटफुगीचा त्रास देखील होत असेल तर त्याकडे अधिक लक्ष देणं आवश्यक आहे. अमेरिकेतील द सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शनच्या (CDC) म्हणण्यानुसार, ब्लड शुगरमुळे (Blood Sugar) गॅस्ट्रोपॅरेसिसची (Gastroparesis) स्थिती निर्माण होते. ही स्थिती अन्न पचनावर परिणाम करते. ही स्थिती दीर्घकाळ राहू शकते. बद्धकोष्ठतेमुळे (Constipation) देखील पोटफुगीचा त्रास होतो. यामुळे ब्लड शुगर वाढू शकते. ही बाब डायबेटिजच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते.
हायपरग्लायसेमिया (Hyperglycaemia) ही एक वैद्यकिय स्थिती असून, ब्लड शुगर वाढल्यानं ही स्थिती निर्माण होते. डायबेटिसच्या रुग्णांमध्ये ही बाब सर्वसामान्य असते. त्यामुळे गॅसेस किंवा ब्लॉटिंगचा त्रास होत असेल तर काही पदार्थ आहारातून वर्ज्य करावेत. वारंवार असा त्रास होत असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
हे वाचा - सकाळी ब्रश करण्यापूर्वी प्या एक ग्लास पाणी; जाणून घ्या याचे अनेक फायदे
डायबेटिसच्या रुग्णांमध्ये बद्धकोष्ठतेमुळं ब्लॉटिंगची समस्या निर्माण होते. थोडसं खाल्ल्यानंतरही पोट भरल्यासारखं वाटणं, उलटीची भावना निर्माण होणं, आजारी असल्यासारखं वाटणं, भूक न लागणं आणि विनाकारण वजन कमी होणं ही ब्लॉटिंगची प्रमुख लक्षणं आहेत. हार्ट बर्न किंवा ब्लॉटिंगची अनेक कारणं आहेत. त्यामुळे डायबेटिस असल्यास पचनसंस्थेच्या (Digestion System) विकारांकडे दुर्लक्ष करू नये. रिसर्च सेंटर मायो क्लिनिकनं (Mayo Clinic) दिलेल्या माहितीनुसार, गॅस्ट्रोपॅरेसिस हा डायबेटिसमुळे होत नाही. परंतु, तो ब्लड शुगर लेव्हलवर नक्की परिणाम करतो. जर तुम्हाला डायबेटिस असेल तर वारंवार ब्लड शुगर लेव्हल कमी जास्त होऊन त्रास होऊ शकतो.
हे वाचा - Rice water : कोणत्या औषधापेक्षा कमी नाही भाताचं पाणी; 'या' समस्यांवर रामबाण उपाय
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा. द्रव पदार्थ (Liquid) भरपूर प्रमाणात सेवन करावेत. नियमित व्यायाम करावा. आठवड्यातून 4 वेळा 20 ते 30 मिनिटं वेगात चालण्याचा व्यायाम केल्यास आतड्यांचे कार्य सुधारतं. जर तुम्ही पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थ सेवन केले नाही तर फायबर योग्य पद्धतीनं काम करणार नाही आणि त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होईल. त्यामुळे द्रव पदार्थांचे सेवन करा. त्यातही पाणी पुरेशा प्रमाणात प्या. यामुळे पचनसंस्थेतील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होईल आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.