मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /मुलगी झाली होsss! सलून चालवणाऱ्या 2 भावांनी आनंदात ग्राहकांना दिली भन्नाट ऑफर

मुलगी झाली होsss! सलून चालवणाऱ्या 2 भावांनी आनंदात ग्राहकांना दिली भन्नाट ऑफर

ही लस वेळेआधी बाळ जन्माला येण्याचं रिस्क कमी करतं. शिवाय कोव्हीड पॉझिटीव्ह असताना जरी बाळाचा जन्म झाला तरी, त्याला कोरोनाचा धोका कमी होतो. रॉयल कॉलेज ऑफ ओब्स्टेट्रिशियन ऍन्ड गायनाकॉलॉजिस्ट डॉ. पैट ओ'ब्रायन यांच्यामते ही लस फायदेशीर आहे त्यामुळे गर्भवती महिलांनी कोरोना लशीबद्दल मना शंका बाळगू नये.

ही लस वेळेआधी बाळ जन्माला येण्याचं रिस्क कमी करतं. शिवाय कोव्हीड पॉझिटीव्ह असताना जरी बाळाचा जन्म झाला तरी, त्याला कोरोनाचा धोका कमी होतो. रॉयल कॉलेज ऑफ ओब्स्टेट्रिशियन ऍन्ड गायनाकॉलॉजिस्ट डॉ. पैट ओ'ब्रायन यांच्यामते ही लस फायदेशीर आहे त्यामुळे गर्भवती महिलांनी कोरोना लशीबद्दल मना शंका बाळगू नये.

मुलीचा जन्म होणे ही आधुनिक काळातही नकोशी घटना बनताना आपण अनेकदा पाहतो. ग्वाल्हेरमध्ये मात्र याउलट घडल्याचं सुखद वास्तव समोर आलं आहे.

ग्वाल्हेर, 6 जानेवारी : स्त्रीभ्रूणहत्या ही आजही भारतातली एक मोठी समस्याच आहे. मुलगी (girl child) जन्मल्यावर अनेकदा कुटुंबात आनंदाऐवजी दुःखाचीच भावना ठळकपणे दिसते. मात्र याला काही सुखद अपवाद आहेतच. असाच एक अपवाद ग्वालियरमध्ये समोर आला आहे. ग्वालियरमध्ये (Gwalior)  एका हेअर सलूनवाल्याच्या (hair saloon owner) घरात मुलीचा जन्म झाला. या आनंदाला साजरं करण्यासाठी त्यांनी चक्क दिवसभर मोफत कटिंग (free hair cut offer) करण्याची ऑफर दिली.

हे सलून दोघं भाऊ मिळून चालवतात. या भावांची नावं आहेत सलमान (Salman khan) आणि अरबाज खान. या कृतीतून त्यांना संदेश द्यायचा होता, की केवळ मुलगा होणं ही नाही तर मुलगी होणं हीसुद्धा आनंदाचीच गोष्ट असते आणि हा आनंद साजरा केला पाहिजे.

4 जानेवारी रोजी या दोन भावांनी ही ऑफर दिली. शिवाय ही ऑफर फक्त एकाच सलूनमध्ये नव्हती. या दोघा भावांचं सलून ग्वाल्हेरमध्ये कुम्हरपूरा, शिवाजीनगर आणि नदीपलीकडचं टाल या भागांमध्ये आहे. या तिन्ही ठिकाणच्या सलूनमध्ये हेअरकट दिवसभर मोफत करण्यात आला. ऑफरबाबत उत्सुकता निर्माण झाली. त्यांनी दिवसभर मोठ्या संख्येनं सलमानच्या सलूनसमोर रांग लावत हेअरकट करवून घेतला.

हे वाचा - अभिज्ञा भावे मेहूल पैसोबत अडकली विवाहबंधनात; लग्नाचा VIDEO पाहिलात का?

सलमान म्हणाला, "आजही देशात अशी अनेक घरं आहेत, जिथं मुलीचा जन्म झाल्यावर लोक दुःखी होतात. मला हीच मानसिकता बदलण्याचा लहानसा का होईना प्रयत्न करायचा होता"

सलमानच्या घरी 26 डिसेंबरला मुलीचा जन्म झाला. दोघाही भावांना या घटनेचा खूप आनंद झाला. त्यादिवसापासूनच असं काहीतरी करायचं त्यांच्या मनात होतं. मग त्यांनी एक दिवस मोफत हेअरकट करत ही बाब साजरी करायची ठरवली. लोकांनी यासाठी दोघा भावांचं खूप कौतुक केलं.

First published:

Tags: Gwalior, Salman khan