मुंबई, 06 जानेवारी : अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) मेहुल पैसोबत (Mehul Pai) विवाह बंधनात अडकली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. त्यांची जोडी अतिशय सुंदर दिसत आहे. जवळच्याच लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला आहे. मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात अभिज्ञा भावेचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे तिच्या लग्नाची बातमी समजताच चाहत्यांनी अभिज्ञा आणि मेहुलवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिज्ञा भावेनी आजपासून तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. अभिज्ञा भावे वधू वेषात अतिशय सुंदर दिसत आहे. या दोघांनी गुलाबी रंगाचे कपडे घातले आहेत. अभिज्ञा भावेचा नवरा मेहूल पै मुंबईत राहतो. ऑक्टोबर महिन्यात या दोघांचा साखरपुडा झाला होता. तिच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाले होते.
सध्या ती रंग माझा वेगळा या स्टार प्रवाहवरील मालिकेत दिसून येत आहे. त्या आधी तिने खुलता कळी खुलेना, लगोरी, प्यार की एक कहानी अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. अभिज्ञा अभिनय क्षेत्रात येण्याआधी एअर हॉस्टेस होती.
2020 मध्ये अनेक सेलिब्रिटींची लग्न झाली. आता 2021 मध्येही अनेक मराठी सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. या वर्षातही अभिज्ञा पाठोपाठ, मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर, सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक असे अनेक कलाकार लग्नबंधनात अडकणार आहेत