मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

हळदीचं अतिसेवनही आरोग्यासाठी ठरू शकतं धोकादायक, वाचा दुष्परिणाम

हळदीचं अतिसेवनही आरोग्यासाठी ठरू शकतं धोकादायक, वाचा दुष्परिणाम

हळदीचे फायदे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. हळद अत्यंत आरोग्यदायक आहे. शरीराबरोबरच त्वचेसाठी हळद उपयुक्त आहे. हळदीचा वापर करून चेहऱ्याच्या समस्या कमी करता येतात. 1 चिमूट हळद, 1 चमचा साय आणि पाव चमचा गुलाब पाणी मिसळून पेस्ट तयार करा.

हळदीचे फायदे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. हळद अत्यंत आरोग्यदायक आहे. शरीराबरोबरच त्वचेसाठी हळद उपयुक्त आहे. हळदीचा वापर करून चेहऱ्याच्या समस्या कमी करता येतात. 1 चिमूट हळद, 1 चमचा साय आणि पाव चमचा गुलाब पाणी मिसळून पेस्ट तयार करा.

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. या दिवसांत हळदीचं जास्त प्रमाणात सेवन करणं शरीराला हानिकारक ठरू शकतं.

नवी दिल्ली, 29 मे : गेल्या वर्षीपासून कोरोनाने सर्वत्र थैमान घातलं आहे. त्या पार्श्वभूमीवर शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेक उपाययोजना तज्ज्ञांनी सुचवल्या. अनेकांनी त्यानुसार वागायला सुरुवातही केली. हळदीचं (Turmeric) सेवन हा त्यातलाच एक उपाय. हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट्स (Anti-Oxidants) मोठ्या प्रमाणात असतात. तसंच, अँटी-इन्फ्लेमेटरी (Anti-Inflammatory) गुणधर्मही हळदीत असतात. शरीराला रोगांपासून वाचवण्यासाठी हे घटक उपयुक्त ठरतात, पण याची दुसरी बाजूही आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. या दिवसांत हळदीचं जास्त प्रमाणात सेवन करणं शरीराला हानिकारक ठरू शकतं. कारण हळदीचा गुणधर्म उष्ण आहे. त्यामुळे उष्णता जास्त असलेल्या दिवसांमध्ये हळद जास्त प्रमाणात पोटात गेल्यास त्याचा त्रास होऊ शकतो. उन्हाळ्याच्या दिवसांत हळदीचं मोठ्या प्रमाणावर सेवन केल्यास पोटात जळजळ होऊ शकते किंवा सूजही येऊ शकते. रोजच्या जेवणातून हळद मोजक्या प्रमाणात शरीरात जातेच. त्याव्यतिरिक्त आणखी हळदीचं सेवन केल्यास पोटात त्रास होऊ शकतो. त्यामुळे उष्णतेच्या काळात हळदीचं सेवन मोजक्या प्रमाणातच केलं पाहिजे.

(वाचा - रात्री झोप लागत नाही? दुधात तूप घालून प्या...; जाणून घ्या तूप खाण्याचे 6 फायदे)

हळदीमध्ये रक्त पातळ करण्याचे गुणधर्म असतात. जास्त प्रमाणात हळदीचं सेवन केलं गेलं, तर रक्त पातळ होण्याचं प्रमाण वाढू शकतं. त्यामुळे अगदी छोटीशी जखम झाली, तरी जास्त रक्तस्राव होण्याचा धोका नाकारता येत नाही. तसंच महिलांमध्ये मासिक पाळीच्या (Menstrual Cycle) वेळी जास्त रक्तस्रावही (Bleeding) होऊ शकतो. त्यामुळे थकवा येऊ शकतो. हळदीमध्ये असलेला कुरकुमिन हा घटक रक्त पातळ करण्याचं काम करतो.

(वाचा - Saline Gargle : फक्त गुळण्या करा आणि तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह ओळखा)

गर्भवती महिलांनी हळद जास्त प्रमाणात खाल्ल्यास केवळ त्यांनाच नव्हे, तर गर्भातल्या बाळालाही त्रास होऊ शकतो. हळदीच्या जास्त सेवनामुळे गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काळात रक्तस्राव होऊ शकतो. तो मिसकॅरेजचं कारणही बनू शकतो. उन्हाळाच्या दिवसांत हळदीचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास मुतखडाही होऊ शकतो. हळदीत ऑक्सलेट नावाचं तत्त्व असतं. ते कॅल्शियमला (Calcium) शरीरात योग्य प्रकारे मिसळू देत नाही. त्यामुळे मुतखडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(वाचा - काम करताना झोप, कंटाळा येऊ नये म्हणून तुम्हीही सतत Coffee पिता का? मग हे वाचाच)

हळदीचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास उलट्या आणि जुलाबही होऊ शकतात. हळदीतला कुरकुमिन (Curcumin) हा घटक पचनाशी संबंधित गुंतागुंत वाढवू शकतो. त्यामुळे उलट्या-जुलाब होऊ शकतात. हळद रोजच्या आहारात असणं आवश्यक आहेच, पण या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या, तर हळदीचं सेवन मोजक्या प्रमाणातच केलं पाहिजे, हे स्पष्ट होतं.
First published:

Tags: Health Tips

पुढील बातम्या