मुंबई, 29 मे : आपल्यापैकी अनेक जण कॉफीचे (Coffee) शौकीन आहेत. कधी कामासाठी तर कधी रिलॅक्स होण्यासाठी आपण कॉफीचा आधार घेतो (Benefits of coffee). परंतु कॉफीमुळे अनेकदा आपल्या शरीरावर प्रतिकूल परिणाम (Side effects of coffee) होऊ शकतो. आपण हाती घेतलेला प्रोजेक्ट किंवा असाईनमेंट वेळेआधी पूर्ण करण्यासाठी आपल्याला झोप येऊ नये किंवा आळस येऊ नये म्हणून तुम्ही कॉफीची मदत घेता. पण खरंच याचा काही फायदा झाला आहे होतो का याबाबत संशोधकांनी अभ्यास केला आहे.
मिशीगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी नुकतंच एक संशोधन केले. झोपेपासून वंचित असलेल्या सहभागींच्या प्लेस किपिंगवर कॅफिनचा काय परिणाम होतो, हे जाणून घेण्यासाठी केलेलं हे पहिलं संशोधन आहे. युनिव्हर्सिटीच्या स्लिप अँड लर्निंग लॅबमध्ये हे संशोधन केले असून. लर्निंग, मेमरी आणि कॉग्निशन हे संशोधन मे 2020 च्या जर्नल ऑफ एक्सपिरीमेंटल सायकॉलॉजी या नियतकालिकेत प्रसिद्ध झालं आहे.
जे काम काळजीपूर्वक करण्याची गरज आहे, असं काम या संशोधनासाठी निवडलेल्या 275 जणांना देण्यात आलं. या सहभागी व्यक्तींची झोपेअभावी (Sleep) कार्यक्षमता बिघडलेली असताना कॅफिनच्या मदतीने त्यांनी यशस्वीरित्या हे काम पूर्ण केलं. त्यानंतर त्यांना अधिक आव्हानात्मक आणि लहान टप्पे असलेले प्लेस किपिंगचं (Place Keeping) काम देण्यात आलं. कोणताही टप्पा न वगळता विशिष्ट क्रमाने हे काम पूर्ण करायचं होतं. अशावेळी या लोकांवर कॅफिनचा जास्त परिणाम झाला नाही, असं दिसून आलं.
हे वाचा - रात्री झोप लागत नाही? दुधात तूप घालून प्या...; जाणून घ्या तूप खाण्याचे 6 फायदे
विद्यापीठाचे मानसशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक किम्बर्ली फिन यांनी सांगितल की, कॅफिनमुळे जागरूक राहण्याची किंवा एखाद्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याची क्षमता सुधारू शकते. पण वैद्यकीय चुका किंवा कार अपघातासारख्या गोष्टींना कारणीभूत ठरणाऱ्या प्रतिक्रियात्मक त्रुटींवर आळा घालण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकत नाही.
कॅफिन हा मानसिक उत्तेजक म्हणून काम करणारा आणि जागरूकता वाढवणारा एक घटक आहे. त्यामुळे अनेक कार्यालये कॉफी मशीन्सने व्यापलेली असतात. तथापि कॉफी आपल्या कमी झोपेचं कारण ठरब शकत नाही. मात्र झोपेच्या अभावामुळे मधुमेह, डिप्रेशन, हृदयविकाराचा झटका इत्यादी आजारांचा त्रास होऊ शकतो.
हे वाचा - रोज प्या 'तुळशीचं दूध'; Stress जाईल पळून! कसं करायचं, कधी प्यायचं?
फिटबिटने 2019 मध्ये केलेल्या अभ्यासानुसार, झोपेपासून वंचित राहण्याच्या समस्येत भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2016 मध्ये जर्नल ऑफ फॅमिली मेडिसीन अँड प्रायमरी केअरमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, भारतातील सुमारे 33 टक्के प्रौढ व्यक्ती निद्रानाश (Insomnia), झोपेची समस्या, गाढ झोप न लागणे या विकारांनी त्रस्त आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.