मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

खाजगी आयुष्यात नाक खुपसणाऱ्यांपासून सुटका करायची आहे? या टिप्स फोलो करा

खाजगी आयुष्यात नाक खुपसणाऱ्यांपासून सुटका करायची आहे? या टिप्स फोलो करा

आपल्या आजूबाजूला असे लोक आहेत जे आपल्या खाजगी आयुष्याबद्दल चर्चा करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.

आपल्या आजूबाजूला असे लोक आहेत जे आपल्या खाजगी आयुष्याबद्दल चर्चा करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.

आपल्या आजूबाजूला असे लोक आहेत जे आपल्या खाजगी आयुष्याबद्दल चर्चा करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 सप्टेंबर : सोशल मीडियामुळे खासगी आयुष्य चव्हाट्यावर आलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सोशल मीडियाचा पावलोपावली वापर करणारे चर्चा करणाऱ्यांना खाद्य पुरवतात. मात्र, चर्चा करणारे लोक कसलीही आणि कोणत्याही गोष्टीची चर्चा करू शकतात. वेळप्रसंगी तोंडावर खासगी प्रश्न विचारालयाही मागे-पुढे पाहत नाहीत. अशा प्रश्नांना उत्तर देणं नकोसं वाटलं, तरी काहीवेळा नाईलाज होतो व उत्तर द्यावंच लागतं. असे प्रश्न समोर आल्यावर काय करावं हे पट्कन सुचत नाही. त्यावेळी कोणत्या पद्धतीनं अशा खासगी प्रश्नांना सहज बगल देता येईल, चला जाणून घेऊ.

लोकांच्या खासगी आयुष्यात डोकावायला अनेकांना आवडतं. अशा लोकांची समाजात कमतरता नाही. त्यामुळे खासगी प्रश्नांना उत्तर देण्याची वेळ प्रत्येकावरच येते. काही जण समोरच्याशी तोडून बोलतात, तर काही त्या व्यक्तीलाच टाळू लागतात. मात्र असे प्रसंग वारंवार येऊ शकतात. त्यावर शिताफीनं मात करता यायला हवी.

व्यक्तिगत आयुष्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना थोपवण्याचा सर्वांत सोपा पर्याय म्हणजे समोरच्याला स्पष्टपणे तसं सांगणं. या मुद्द्यावर किंवा विषयावर मला बोलायचं नाहीये असं सांगणं तुमची अशा प्रश्नांपासून सुटका करेल. समोरच्याला काय वाटेल, असं थेट बोलावं का असं अनेकांना वाटतं. त्यामुळे अशा प्रश्नांचा दबाव येतो. मात्र स्पष्ट बोलण्यानं हा दबाव कमी होऊन समोरच्याला तुमचं मत कळतं.

वाचा - आई होण्याचं योग्य वय कोणतं? तज्ज्ञ काय सांगतात? वाचा सविस्तर

अशाप्रकारे स्पष्टपणे बोलण्याची तुमची हिंमत नसेल, तर दुसऱ्या प्रकारेही तुम्ही उत्तर देऊ शकता. खासगी प्रश्न विचारणाऱ्याला विश्वासात घेऊन त्यांची काळजी आपल्याला कळते असं सांगा. त्यानंतर मग त्या गोष्टीवर बोलण्यासाठी तुमच्यात इमोशनल एनर्जी अर्थात भावनिक ऊर्जा नसल्याचं सांगा. लगेच उत्तर देण्याऐवजी नंतर कधीतरी त्यावर बोलू असं सांगून विषय त्या क्षणापुरता थांबवा.

एखादी व्यक्ती थोड्याच वेळात खासगी प्रश्नांवर घसरणार आहे, याची जाणीव झाली, की विषय बदलण्याची तयारी ठेवा. व्यक्तिगत आयुष्याबाबत प्रश्न विचाराणाऱ्यांना तुम्ही या पद्धतीनं दूर ठेवू शकता.

काही लोकांना मात्र कितीही सांगितलं तरी कळत नाही. सतत इतरांच्या आयुष्यात डोकावायला त्यांना आवडतं. स्पष्ट सांगूनही त्या व्यक्तीला समजत नसेल, तर अशा व्यक्तीपासून दूर राहणं केव्हाही उत्तम ठरतं.

वैयक्तित आयुष्याबाबत विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमुळे काहीवेळा माणसं बोलायला घाबरतात. दडपण घेतात. समाजात वावरण्याची त्यांना भीतीही वाटते. मात्र लोकांना न दुखवता अशा प्रश्नांपासून सुटका करून घेण्याची कला अवगत केली पाहिजे. काही वेळा स्पष्टवक्तेपणाही चांगला असतो. परिस्थिती पाहून योग्यप्रकारे अशा प्रश्नांना बगल देता यायला हवी.

First published:

Tags: Personal life