बदललेली जीवनशैली, चुकीचा आहार, बैठं काम आणि व्यायामाच्या अभावामुळे लठ्ठपणाची (Obesity) समस्या वाढत आहे. लठ्ठपणामुळे हृदयविकार, डायबेटीस यांसारख्या गंभीर आजारांचा (Disease) धोका वाढतो. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यासाठी प्रयत्न आवश्यक ठरतात. याशिवाय लठ्ठपणासाठी आणखी काही गोष्टी कारणीभूत असतात. त्यात रात्रीच्या वेळी शांत झोप न घेणं हेदेखील प्रमुख कारण असतं. हे कारण प्रामुख्याने महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतं. वजन कमी करण्यासाठी रात्री शांत झोप (Sleep) घेणं आवश्यक आहे. याशिवाय वजन कमी करण्यासाठी काही घरगुती उपायदेखील (Home Remedies) फायदेशीर ठरतात. दालचिनीचं पाणी (Cinnamon Water) पिणं हा या उपायांपैकी एक होय. आरोग्याच्या दृष्टीनं दालचिनीचे अनेक फायदे आहेत. वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी दालचिनीचं पाणी उत्तम ठरू शकतं. `हर जिंदगी डॉट कॉम`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
वजन कमी करण्यासाठी महिला सर्वतोपरी प्रयत्न करतात; पण त्या झोपेच्या समस्येकडे दुर्लक्ष करतात. झोप पुरेशी आणि शांत नसेल तर पित्त होणं, इमोशनल इटिंग, इन्सुलिनशी निगडित समस्या निर्माण होतात. त्यामुळे वजन कमी होण्यासाठी शांत आणि पुरेशी झोप आवश्यक आहे. तसंच झोपेपूर्वी तुम्ही काय खाता आणि पिता याकडे लक्ष देणंही गरजेचं आहे. झोपण्यापूर्वी चहा (Tea) किंवा कॉपी (Coffee) पिणं अपायकारक ठरतं. यामुळे झोपेचा पॅटर्न बिघडतो; मात्र काही पेयं प्यायल्यास वजन कमी होतं, ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते आणि फॅट्स कमी होण्यास मदत होते. या पेयांमध्ये दालचिनीचं पाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. पचनक्रिया बूस्ट (Metabolism Boost) होण्यासाठी दालचिनीचं सेवन फायदेशीर ठरतं. तसंच यामुळे बॉडी फॅट्स (Body Fat) कमी होतात. ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते आणि भूक कमी लागते.
(Male-Female Friendship: मुलगा अन् मुलीमध्ये फक्त मैत्री असते? या नात्यात रोमान्सची शक्यता किती?)
दालचिनीचं पाणी वजन कमी करण्यास मदत करते, असं अलीकडच्या संशोधनातून दिसून आलं आहे. त्यामुळे या दाव्यात काही तथ्य असू शकतं. दालचिनी थर्मोजेनेसिस (शरीरातली उष्णता) 20 टक्क्यांपर्यंत वाढवते, यामुळे कॅलरी बर्न होण्यास मदत होते असं एका अभ्यासात म्हटलं आहे. दालचिनीमुळे भूक आणि खाण्याची इच्छा कमी होते. यामुळे अनहेल्दी पदार्थ खाण्यावर नियंत्रण येतं. दालचिनीचं पाणी चरबी आणि कार्बोहायड्रेट्सच्या पचनास मदत करतं. हे घटक चरबीच्या रूपात शरीरात जमा होण्यापासून हे पाणी प्रतिबंध करतं. त्यामुळे व्यायामासोबत रोज दालचिनीचं पाणी पिणं हितावह ठरू शकतं.
दालचिनीचं पाणी तयार करण्यासाठी सर्वप्रथम एक कप पाणी, एक चमचा दालचिनी पावडर, एक चमचा मध, 1/4 लहान चमचा काळी मिरी पावडर, एक छोटा चमचा लिंबाचा रस हे साहित्य घ्यावं. त्यानंतर पाणी उकळून घ्यावं. त्यात दालचिनी पावडर टाकावी. काळी मिरी पावडर, मध (Honey) आणि लिंबाचा रस घालून हे मिश्रण एकत्र करावं. हे मिश्रण उकळून घ्यावं. त्यानंतर हे गरम पाणी गाळून प्यावं.
दालचिनी आरोग्यासाठी हितावह असते. दालचिनीत अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. झोपण्यापूर्वी चहा म्हणून तुम्ही दालचिनीचं पाणी पिऊ शकता. यामुळे पचनक्रिया सुधारते. तसंच हे पाणी डिटॉक्स म्हणून लाभदायी ठरतं. या पाण्यामुळे वजन लवकर कमी होतं. तुम्हाला आरोग्याशी निगडित अन्य काही समस्या असतील, तर तज्ज्ञांच्या सल्ल्यानं तुम्ही या पाण्याचा डाएटमध्ये समावेश करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weight loss, Weight loss tips