फोर्ब्सने (Forbes) अलीकडेच 2020 वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या युट्युबर्सची (Youtubers) यादी जाहीर केली आहे. अनेकजण युट्यूबच्या माध्यमातून पैसे कमावण्याचा प्रयत्न करतात. परंतु प्रत्येकाला ते शक्य होत नाही. विविध प्रकारची माहिती किंवा कंटेंट टाकून युट्युबवर आपल्या चाहत्यांना माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु प्रत्येकजण यामध्ये यशस्वी होत नाही. फोर्ब्सच्या या यादीमध्ये 9 वर्षाच्या मुलाने पहिला क्रमांक पटकावला असून त्याच्या कमाईचे आकडे पाहून तुम्हीदेखील चकित व्हाल. जाणून घ्या अशा टॉप टेन युट्यूबर्सबद्दल ज्यांनी सर्वाधिक कमाई केली आहे.