नवी दिल्ली, 10 जानेवारी : व्हायरल इन्फेक्शनचा (viral infection) धोका कमी करण्यासाठी, सामाजिक अंतर राखणं, मास्क घालणं आणि स्वच्छता पाळणं यासारख्या काही मूलभूत बाबींचं पालन केलं पाहिजे. पण यासोबतच आपण दिवसभरात जे काही खातो आणि पितो ते शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. पौष्टिक भाज्या, फळं आणि मसाल्यांनी समृद्ध असलेले खाद्यपदार्थ आणि पेये रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास (Immunity Booster) आणि विषाणूजन्य संसर्गाची शक्यता कमी करण्यास मदत करतात, असं टीव्ही 9 नं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. मजबूत प्रतिकारशक्तीसाठी आपण आयुर्वेदिक काढा देखील घेऊ शकता. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काढा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक काढा घरी बनवू शकता. हा काढा मसाले आणि औषधी वनस्पती वापरून तयार केला जातो. हे मसाले आणि औषधी वनस्पती शरीरावर चांगला परिणाम करतात. हा काढा नैसर्गिक घटकांचा वापर करून बनवलेला असल्यानं त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. चला जाणून घेऊया रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हा काढा कसा बनवायचा. साहित्य 1 इंच ताजं आलं 1-2 गुळाचे तुकडे काळ्या मिरीचे काही तुकडे चिमूटभर ओवा दालचिनीच्या 3-4 छोट्या काड्या चिमुटभर बडीशेप लवंगेचे 5-6 तुकडे 1-2 तुकडे काळी वेलची (मोठी वेलची) 1 टीस्पून घरगुती चहा मसाला अशा प्रकारे बनवा काढा एका खोलगट पातेल्यात 2 ग्लास पाणी घेऊन गॅसवर उकळायला ठेवा. त्यात किसलेलं आलं व इतर साहित्य घाला. पाणी काळं होईपर्यंत 7 ते 10 मिनिटं उकळू द्या. हे पेय एका ग्लासमध्ये गाळून घेऊन पिण्यासारखे गरम असतानाच प्यावे. हे वाचा - Punjab Election 2022: प्रथमच बहुरंगी लढत, शिअद आणि काँग्रेसची मते अनेक पक्षांमध्ये विभागली जाणार काढ्याचे फायदे काळी मिरी, ओवा, लवंगा, बडीशेप आणि वेलची यांसारख्या मसाल्यांमध्ये दाह-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. ते घसा खवखवणं, सर्दी आणि खोकला यात आराम देतात. अनेक अभ्यासांनुसार, आहारात मसाल्यांचा समावेश केल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होते हे सिद्ध झालंय. ते प्रतिकारशक्ती मजबूत करतात आणि फ्री रॅडिकल्समुळं होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करतात. हे वाचा - लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात आल्यामध्ये दाह-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे जळजळ दूर करण्यास मदत करतात. या पेयामध्ये थोड्या प्रमाणात गूळ टाकल्यानं चव तर वाढतेच. शिवाय, ते श्वसनसंस्थेसाठीही फायदेशीर ठरतं. याच्यामुळं शरीरातील अपायकारक घटक बाहेर काढून टाकले जातात आणि सर्दी आणि फ्लूशी सामना करण्यासाठी ताकद मिळते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.