मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीला भीषण अपघात

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीला भीषण अपघात

अपघातात शबाना आझमी यांच्या तोंडाला मार लागला असून त्या जखमी झाल्या आहेत.

अपघातात शबाना आझमी यांच्या तोंडाला मार लागला असून त्या जखमी झाल्या आहेत.

अपघातात शबाना आझमी यांच्या तोंडाला मार लागला असून त्या जखमी झाल्या आहेत.

  • Published by:  Akshay Shitole
नवी मुंबई, 18 जानेवारी : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात शबाना आझमी यांच्या तोंडाला मार लागला असून त्या जखमी झाल्या आहेत. जावेद अख्तर (Javed Akhtar) हे मागील गाडीने प्रवास करत होते, अशी माहिती आहे. पुण्याच्या दिशेला जाताना खालापूर येथे शबाना आझमी यांच्या गाडीला अपघात झाला. खालापूर टोल नाक्याजवळ पुढे जाणाऱ्या ट्रकला शबाना आझमी यांच्या टाटा सफारी गाडीने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात शबाना आझमी यांच्यासह त्यांच्या गाडीचा चालकही जखमी झाला आहे. अपघातानंतर शबाना आझमी आणि त्यांच्या चालकाला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून काही वेळानंतर डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती देण्यात येण्याची शक्यता आहे. कोण आहेत शबाना आझमी? -शबाना आझमी यांचा जन्म 18 सप्टेंबर 1950 रोजी झाला -अंकुर या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण -आझमी यांनी आतापर्यंत आपल्या करिअरमध्ये जवळपास 130 पेक्षा जास्त चित्रपटात काम केले -जुनून, शतरंज के खिलाडी, कंधार, स्पर्श, पार, सती, अर्थ, गॉडमदर यासारख्या अनेक चित्रपटात काम - जॉन श्लेसिंगर यांचा मॅडम सोऊसाटस्का आणि रोनाल्ड जॉफ यांचा सिटी ऑफ जॉय या हॉलिवू़ड चित्रपटातही काम दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघाताचं प्रमाण लक्षणीय वाढलं आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, मुंबई-गोवा, पुणे-बंगळुरू या महामार्गांवर सतत अपघाताच्या घटना घडत आहेत. आता तर लोकप्रतिनिधींसह इतर क्षेत्रातील नामांकित व्यक्तींच्या गाडीला होणाऱ्या अपघातांच्या घटनाही वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे अनेक महामार्ग मृत्यूचे सापळे ठरत असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे.
First published:

Tags: Shabana Azami

पुढील बातम्या