मुंबई 13 डिसेंबर : आपल्या खाद्यसंस्कृतीत मसालेदार आणि तेलकट पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. परंतु तेलकट पदार्थांचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे रक्तातील बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. कोलेस्टेरॉल वाढल्यास रक्तदाब वाढतो आणि हृदयविकाराच्या झटका येण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नियमित आहारात अधिकाधिक आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करणे आवश्यक असते. निरोगी पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या फळं असतात. तसे तर फळं खायला आपल्याला आवडतात. पण एक फळ जे खूप पौष्टिक आहे. पण दिसायला थोडे विचित्र आहे आणि त्याचे नावही तसेच आहे. ते म्हणजे ड्रॅगन फ्रुट. मात्र तुम्हाला निरोगी राहायचे असेल आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवायचे असेल तर तुम्ही ड्रॅगन फ्रुट नक्की खायला हवं. पाहुयात त्याचे इतर फायदे.
चहानंतर लगेच पाणी पिता? आत्ताच सोडा सवय; होतात हे गंभीर दुष्परिणामड्रॅगन फ्रूट खाण्याचे फायदे ड्रॅगन फ्रुटचा आतला भाग पांढरा आणि गुलाबी असतो. अनेकांना हे फळ खायला खूप आवडते. हे फळ खूप पौष्टीक असते. यात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स, कॅल्शियम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन सी आढळते. झी न्यूज हिंदीने प्रसिद्ध आहारतज्ञ डॉ. आयुषी यादव यांनी या फळाबाबत केलेल्या मार्गदशर्नाचा रिपोर्ट दिला आहे. त्यानुसार जाणून घेऊया ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने आरोग्याला कोणते फायदे होतात.
हृदयविकाराचा धोका कमी होतो ड्रॅगन फ्रूटमध्ये फॅट फार कमी प्रमाणात असते त्यामुळेच शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल वाढत नाही आणि हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. याशिवाय तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर या फळाचा नियमित आहारात समावेश करू शकता. याच्या बियांमध्ये आरोग्यासाठी फायदेशीर असलेले ओमेगा-3 फॅटी ऍसिड आढळते. हृदयाचे आजार राहतील दूर ड्रॅगन फ्रुटमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते आणि फायबरयुक्त पदार्थ हृदयासाठी चांगले असतात. त्यामुळे याचा नियमित आहारात समावेश केल्यास कोरोनरी आर्टरी डिसीज आणि कार्डिओव्हस्कुलर डिसीजचा धोका कमी होतो. शिवाय रक्तदाब आणि वजनही नियंत्रित ठेवण्यास मदत होते. मुन्नाभाईची ‘जादू की झप्पी’ खोटी नव्हे; प्रत्यक्षातही खरंच होतात असे चमत्कारिक फायदे रोगप्रतिकारशक्ती होईल मजबूत कोरोना विषाणू प्रादुर्भावापासून अनेक जण रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर देत आहे. यासाठी ड्रॅगन फ्रूट अतिशय योग्य पर्याय आहे. यात असलेले व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मिनरल्स शरीरासाठी अतिशय महत्त्वाचे असते.